Mahayuti | लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये शिंदे गटाला चांगलं यश मिळालं. शिंदे गटाने बऱ्याच जागांवर विजय मिळविला. तर, अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. लोकसभेनंतर राज्यात आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहे. यासाठी सर्वच पक्ष रणनीती आखत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये विविध कारणांमुळे धुसफूस सुरू असल्याचं दिसून येतंय. काही ठिकाणी उमेदवारीवरुन नेत्यांमध्ये नाराजी दिसून येतेय तर कुठे एका पक्षाला झुकतं माप दिल्याने नेते मंडळीमध्ये नाराजीनाट्य असल्याचं बोललं जातंय. (Mahayuti)
या 5 ऑक्टोबररोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. मोदी मुंबई मेट्रोच्या तिसऱ्या लाईनचे उद्घाटन करणार आहेत. मुंबई ऐवजी ठाण्यात म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
महायुतीत शिंदे गटाला विविध पदं दिल्याने नाराजी?
इतकंच नाही तर, भाजप पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झुकते माप दिले जात असल्याचे देखील म्हटले जात आहे. मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुंबईत करण्याऐवजी ठाण्यात केले जाणार आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना शक्तिप्रदर्शन करण्याची चांगली संधी असणार आहे. (Mahayuti)
त्यातच राज्यातील विविध मंडळांवर शिंदे गटाच्या नेत्यांची वर्णी लागली आहे. एसटी महामंडाळाचे अध्यक्षपद भरत गोगावले यांना मिळालं आहे. तर, सिडको महामंडळाचे अध्यक्षपद हे संजय शिरसाट यांना मिळाले आहे. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. सत्तेतील लाभ व महत्वाची पदे शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला मिळत असल्याचे दिसून येत आहे.
जगावाटपवरुनही शिंदे-भाजपमध्ये वादाची ठिणगी?
यामुळे भाजपमधील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघाचा तिढा वाढला होता. भाजप कार्यकर्ते ठाणे मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यास तयार नव्हते. मात्र, भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दबाव आणून ही जागा शिंदे गटाला सोडण्यास भाग पाडले. आता विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या काही जागांवर शिंदे गटाने दावा केला आहे. यामुळे भाजपमध्ये नाराजी वाढत चालल्याचं बोललं जातंय. (Mahayuti)
News Title – talks of BJPs displeasure in Mahayuti
महत्वाच्या बातम्या-
खुशखबर ! महिंद्रा थार रॉक्सची बुकिंग सुरु; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
संतापजनक! पुण्यात दोन चिमुरड्यांवर स्कुल बस ड्रायव्हरने केला अत्याचार
चाहत्यांना धक्का! प्रेक्षकांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल ‘बिग बॉस’मधून आउट?
राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार? ‘या’ दिवशी घोषणा होण्याची शक्यता
या कारणामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद






