संतापजनक! पुण्यात दोन चिमुरड्यांवर स्कुल बस ड्रायव्हरने केला अत्याचार

On: October 3, 2024 12:37 PM
Pune News
---Advertisement---

Pune News l महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कारण बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशातच आता पुन्हा पुण्यात दोन शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

पुण्यात दोन चिमुकल्यांवर अत्याचार :

शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुणे शहरातील वानवडी भागात घडली आहे. आता या घटनेप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय हा धक्कादायक प्रकार करणाऱ्या 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला देखील पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, 30 सप्टेंबरला स्कुल बस ड्रायव्हर बसने विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. मात्र शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडवत असताना त्या ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्या दोघींसोबत अश्लील चाळे केले.

Pune News l स्कुल बसमधे एक महिला केअर सेंटर असणं बंधनकारक :

या धक्कादायक घटनेतील एका पिडीत मुलीने याबाबत संपूर्ण माहिती तिच्या पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली आहे. मात्र या घटनेतील पिडीत मुलींची प्रकृती व्यवस्थीत आहे.

तसेच नियमाप्रमाणे प्रत्येक स्कुल बसमधे एक महिला केअर सेंटर असणं अत्यंत बंधनकारक आहे. या स्कुल बसमधील महिला केअर टेकर या घटनेवेळी स्कुल बसमधे होती का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र आता या घडलेल्या घटनेनंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील संतापाची लाट उसळली आहे.

News Title – Sexual assault by school bus driver in pune

महत्वाच्या बातम्या-

राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार? ‘या’ दिवशी घोषणा होण्याची शक्यता

या कारणामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद

गुणरत्न सदावर्ते यांचं आदित्य ठाकरेंना आव्हान, वरळीतून निवडणूक लढवणार

नवरात्रीत चार खास राजयोग, ‘या’ 3 राशींना देवी करणार धनवान!

नवरात्रीत सोन्याने दाखवला दरवाढीचा रंग, जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now