राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार? ‘या’ दिवशी घोषणा होण्याची शक्यता

On: October 3, 2024 12:00 PM
Election Commission
---Advertisement---

Vidhansabha Election l महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अगदी जोरात सुरु आहे. कारण आता निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात देखील झाली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधी होणार? :

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जय्यत तयारी सुरु झाली आहे. अशातच आता राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांच्याही मनात निवडणुकीच्या तारखांबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र आता महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

कारण येत्या 8 ऑक्टोबरला जम्मू काश्मीर व हरियाणा या राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागण्याची शक्यता आहे. याशिवाय 10 ऑक्टोबरला हरियाणा- जम्मू काश्मीर निवडणूक कार्यक्रम देखील संपणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vidhansabha Election l या तारखेला आचारसंहिता लागण्याची शक्यता :

मात्र आयोगाच्या नियमानुसार एक निवडणूक कार्यक्रम संपण्यापूर्वी दुसऱ्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करता येत नाही . मात्र त्या काळात निवडणूक आयोगाला देखील तयारी करावी लागत असते. या सर्व बाबींचा विचार करता 13 ऑक्टोबरला रविवार आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीची घोषणा 13 ऑक्टोबरनंतर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबरनंतर सुरु होणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय नियमानुसार महाराष्ट्रात नवी विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्त्वात येणार आहे. कारण निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर 45 दिवसांत नवीन विधानसभेची स्थापना होणे अपेक्षित असते. त्यामुळे निवडणूक आयोग नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक घेण्याची शक्यता आहे.

News Title – Maharashtra Vidhansabha Election Date

महत्वाच्या बातम्या-

या कारणामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद

गुणरत्न सदावर्ते यांचं आदित्य ठाकरेंना आव्हान, वरळीतून निवडणूक लढवणार

नवरात्रीत चार खास राजयोग, ‘या’ 3 राशींना देवी करणार धनवान!

नवरात्रीत सोन्याने दाखवला दरवाढीचा रंग, जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

विधानसभेपूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा थेट भाजपला इशारा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now