शेतकऱ्यांनो कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरीत; ‘या’ शेतकऱ्यांना मिळाला लाभ

On: August 7, 2026 4:49 PM
Farmer Loan Waiver
---Advertisement---

Farmer Loan Waiver | राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घडामोड घडली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील निधी पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या लाखो शेतकऱ्यांना या प्रक्रियेचा लाभ मिळाला असून, खरीप हंगामासाठी नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत.

पहिल्या टप्प्यात 5,029 कोटींचे वितरण :

मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांनी एका क्लिकद्वारे कर्जमाफीच्या पहिल्या हप्त्याचे वितरण केले. या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये तब्बल 5,029 कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले. आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांवर ही रक्कम जमा झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे कर्ज खाते शून्यावर आले असून त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने यानंतर सर्व बँकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या यादीत असूनही आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले नाही, त्यांचे प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांमध्येही टप्प्याटप्प्याने अनुदानाची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे.

Farmer Loan Waiver | मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती :

मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, पहिली लाभार्थी यादी ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली होती. या योजनेत अर्ज करण्याची आवश्यकता नसून शेतकऱ्यांनी केवळ आधार प्रमाणीकरण करायचे होते. त्यानंतर त्यांच्या कर्जखात्यांमध्ये थेट रक्कम जमा करण्यात आली. आतापर्यंत 5,029 कोटी रुपये 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झाले असून संबंधित कर्जखाती निकाली निघाली आहेत.

यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, अनेक खात्यांमध्ये (NPA) वरील व्याजामुळे थकबाकीची रक्कम वाढलेली होती. मात्र बँकांनी ते व्याज माफ केल्यामुळे शासनाने भरलेली रक्कम आणि प्रत्यक्ष थकबाकी समान झाली व संबंधित कर्जखाती शून्यावर आली. दररोज नवीन खाती मंजुरीसाठी येत असून त्यानुसार निधी वितरित केला जाणार आहे. सुमारे 12 लाख खात्यांमध्ये बँकांकडून त्रुटी आढळल्याने ती दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आली असून आठवडाभरात त्या चुका सुधारल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्येही कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

News Title: First Loan Waiver Installment Released

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now