Sambhaji Bhide l आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ओळखले जाणारे संभाजी भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता संभाजी भिडे यांनी एक मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावेळी संभाजी भिडे म्हणाले की, मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदु! भिडेंच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले? :
संभाजी भिडे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. देशाच्या पाठीवर असंख्य अतिक्रमण झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हा हिंदुस्तान आहे. तसेच हिंदी-चिनी आणि हिंदी मुस्लिम भाई म्हणणाऱ्या हिंदूना शत्रू कोण आणि वैरी कोण तसेच वाईट कोण आणि चांगलं कोण हे कळत नाही. कारण हिंदू समाज हा महामूर्ख आहे.
राज्यातील गणेशोत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवातील दांडिया देखील हिंदू समाजाला XXडू बनवत चालला आहे. मात्र आता नवरात्र उत्सवाचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही असे संभाजी भिडे म्हणाले आहेत.
Sambhaji Bhide l महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची सध्या गरज :
यासोबतच सत्ताकारण, राजकारण आणि अर्थकारण हे शूद्र आहे. तसेच हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्ताचा समाज निर्माण करण्याची सध्या गरज आहे असं विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. यासोबतच दुर्गामाता दौडीमध्ये असणाऱ्या पोलिसांनी देखील टोप्या घालून आपल्या सोबत दौडीत पळालं पाहिजे असं देखील संभाजी भिडे म्हणाले आहेत.
संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. कारण हिंदूंचा अपमान करण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला नाही. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर काय कारवाई करणार असा सावल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
News Title – Sambhaji Bhide Statement On Hindu
महत्वाच्या बातम्या-
खुशखबर ! महिंद्रा थार रॉक्सची बुकिंग सुरु; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
संतापजनक! पुण्यात दोन चिमुरड्यांवर स्कुल बस ड्रायव्हरने केला अत्याचार
चाहत्यांना धक्का! प्रेक्षकांची लाडकी कोकण हार्टेड गर्ल ‘बिग बॉस’मधून आउट?
राज्यात विधानसभा निवडणूक कधी होणार? ‘या’ दिवशी घोषणा होण्याची शक्यता
या कारणामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद






