तब्बल दोन वर्षानंतर सुशांतच्या निधनापूर्वीचा व्हिडीओ आला समोर?, दिसतोय खूपच अस्वस्थ

On: December 29, 2022 4:31 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या(Sushant Singh Rajput) मृत्यूला तब्बल अडीच वर्षांचा काळ उलटून गेला तरीही हे प्रकरण सातत्यानं चर्चेत येत आहे. त्यातच रूग्णालयातील एका कर्माचाऱ्याने सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केल्यानं सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

सुशांतच्या मृत्यूला बराच काळा लोटला तरी सुशांतची आत्महत्या होती की हत्या होती हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. सुशांतची बहिण त्याला न्याय मिळावा म्हणून अजूनही प्रयत्न करत आहे.

सुशांतचे प्रकरण चर्चेत असतानाच सोशल मीडियावर सुशांतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलं आहे की, सुशांत त्याच्या शेवटच्या दिवसांत.

या व्हिडीओमध्ये सुशांत खूपच अस्वस्थ दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसत आहे. तसेच तो काहीतरी विचार करत आहे, असंही या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ सुशांतच्या शेवटच्या दिवसांतला आहे, असा अंदाज नेटकरी लावत आहे. परंतु या हा व्हिडीओ खरच त्याच्या शेवटच्या दिवसातला आहे की नाही, याची मात्र अद्याप माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते नाराज होत आहेत. तसेच सुशांतबद्दल हळहळ व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now