‘पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही’, फडणवीसांचा अजित पवारांना टोला

On: December 29, 2022 4:12 PM
---Advertisement---

मुंबई | विधानसभेत सत्ताराधी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. त्यातच विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी(Ajit Pawar) मंत्रीमंडळात महिलांचा समावेश नसल्याच्या मुद्द्यावरून बोलताना अमृता फडणवीस(Amruta Fadnvis) यांचं नाव घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांच्यावर टीका केली होती.

आता गुरूवारी पवारांना यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, दादा तुम्ही म्हणाला की अमृता वहिनींशी बोला. पण दादा तुम्ही सुनेत्रा वहिनींना विचारलं का?,असं म्हणत फडणवीसांनी पवारांना चांगलंच सुनावलं.

एका गोष्टीचं दु:ख आहे की, 2004 ला संधी मिळाली असतानाही पवार साहेबांनी तुम्हाला मुख्यमंत्री केलं नाही. त्यावेळी तुमचे जास्त नेते निवडूण आले होते. कराराप्रमाणे ज्याचे जास्त नेते निवडूण येतील त्यांचा मुख्यमंत्री होता. पण तरीही तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही. असा खोचक टोलाही यावेळी फडणवीसांनी पवारांना लगावला.

दरम्यान, अजित पवार मंगळवारी म्हणाले होते की, मी येऊन अमृता वहिनींना सांगणार आहे की, बघा त्यांच्याकडं रात्री. त्यांनी मनावर घेतलं तर लगेच एखादी महिला मंत्री होईल.

तसेच देवेंद्रजींना काही विचारलं तर म्हणतात मुख्यमंत्र्यांची परवानगी आणा आणि मुख्यमंत्र्यांना काही विचारलं तर म्हणतात देवेंद्रजींनी सांगितलं की मी केलं, अशी फक्त टोलवाटोलवी सुरू आहे, असंही अजित पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now