सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! पाहा तुमच्या पगारात किती हजार रुपयांची भर पडणार?

On: February 4, 2026 5:43 PM
Government Employees
---Advertisement---

DA Hike 2026 | महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जानेवारी 2026 पासून केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) २ टक्क्यांची वाढ निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांनाही थेट फायदा होणार आहे. (Government employees salary)

ही वाढ ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक (AICPI – IW) च्या आधारे ठरवण्यात आली असून, कामगार व रोजगार मंत्रालयाने नुकतीच अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून डी.ए. किती वाढणार यावर असलेली अनिश्चितता आता दूर झाली आहे.

AICPI च्या आधारे DA वाढ निश्चित :

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दर सहा महिन्यांनी, म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये, ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या सरासरीवर निश्चित केला जातो. जानेवारी 2026 ची वाढ ही जुलै ते डिसेंबर 2025 या कालावधीतील निर्देशांकाच्या सरासरीवर आधारित आहे. ( DA Hike 2026)

कामगार व रोजगार मंत्रालयाने 30 जानेवारी 2026 रोजी डिसेंबर 2025 चा AICPI निर्देशांक जाहीर केला असून तो 148.2 इतका नोंदवण्यात आला आहे. या आकडेवारीच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या डी.ए.मध्ये २ टक्क्यांची वाढ निश्चित करण्यात आली असल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली आहे.

DA Hike 2026 | कर्मचाऱ्यांना थकबाकीसह मिळणार दिलासा :

ही वाढ जानेवारी 2026 पासून लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांना मागील महिन्यांची थकबाकी (Arrears) देखील मिळण्याची शक्यता आहे. अधिकृत शासन निर्णय मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असून, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून याबाबत घोषणा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

वाढीव डी.ए.मुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात दिलासादायक वाढ होणार असून, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे.

News Title: DA Hike 2026: Government Employees to Get 2% Dearness Allowance Increase from January

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now