Shreyas Talpade | मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका

On: December 14, 2023 11:58 PM
Shreyas Talpade
---Advertisement---

मुंबई | अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला आहे. श्रेयसला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रेयस तळपदे वेलकम टू जंगल या चित्रपटांचं चित्रिकरण करत होता ते चित्रीकरण संपवून जेव्हा तो घरी आला तेव्हा ही घटना घडली.

श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका

मुंबईतल्या अंधेरीमध्ये असलेल्या बेलव्हू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचंही समजतं आहे. शुटिंग संपून घरी आल्यावर श्रेयस याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो जागीच कोसळला. ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रुग्णालयाने हे म्हटलं आहे आज रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी करण्यात आली. तसंच आता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीत सुधारणा आहे.

दरम्यान, श्रेयस तळपदेने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमध्ये नाव कमावलं आहे. इकबाल हा त्याचा पहिला हिंदी सिनेमा आहे. ओम शांती ओम या सिनेमात तो शाहरुख खान सह झळकला होता. तसंच पुष्पाच्या हिंदी व्हर्जनला त्याने आवाज दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या- 

तारक मेहता मालिकेत सर्वात मोठा बदल, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! – Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

मोठी बातमी! Ajit Pawar मुख्यमंत्री होणार?

INDvSA | मोहम्मद शमी भारतीय संघातून बाहेर?, समोर आलं अत्यंत धक्कादायक कारण

Royal Enfield | मायलेजला ‘बाप’ गाडी; एका लिटरमध्ये ‘इतके’ किलोमीटर धावते

CNG | सर्वसामान्य जनतेला मोठा फटका; सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now