INDvSA | मोहम्मद शमी भारतीय संघातून बाहेर?, समोर आलं अत्यंत धक्कादायक कारण

On: December 14, 2023 6:25 PM
Team India
---Advertisement---

INDvSA | भारतीय संघाचा सर्वात भरवश्याचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. लवकरच सुरु होणार असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमी दिसण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. याबद्दल एक अत्यंत धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे.

नेमका काय आहे प्रकार?

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या (INDvSA) दौऱ्यावर आहे. सध्या भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 सामन्यांची मालिका सुरु आहे. ती झाल्यानंतर तीन सामन्यांची वन डे मालिका आणि त्यानंतर दोन सामन्यांची कसोटी मालिका उभय संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे.

सध्या सुरु असलेल्या T20 मालिकेसाठी जवळपास सर्वच वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. काही जणांना वनडे सामन्यांमध्येही विश्रांती देण्यात आलेली आहे. मोहम्मद शमीचा या विश्रांती दिलेल्या खेळाडूंमध्ये समावेश होता, मात्र कसोटी मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या संघामध्ये मोहम्मद शमीचा समावेश होता. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनूसार शमी या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.

कसोटी मालिकेतून शमीची माघार?

T20 आणि वनडे मालिका खेळण्यासाठी जाहीर झालेला संघ ऑलरेडी दक्षिण आफ्रिकेत आहे, तर कसोटी मालिकेसाठी (INDvSA) निवडण्यात आलेले उर्वरित खेळाडू ज्यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि शमी यांचा समावेश होता ते 15 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत, मात्र तत्पूर्वीच शमीबद्दल चिंताजनक माहिती समोर आली आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनूसार, शमीच्या घोट्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका खेळता येण्याची शक्यता फारच कमी आहे. डॉक्टरांनी देखील त्याला या दुखापतीमुळे विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती काही माध्यमांनी आपल्या बातमीमध्ये दिली आहे. एकूणच शमीची ही दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून शमी माघार घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मोहम्मद शमीच्या जागी कोण?

मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दल किंवा त्याच्या जागी कोण?, याबद्दल बीसीसीआयने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. वरिष्ठ खेळाडू 15 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होतील. दक्षिण आफ्रिकेत (INDvSA) सुरु असलेल्या सामन्यांमुळे भारताचे भरपूर खेळाडू सध्या दक्षिण आफ्रिकेमध्ये आहेत, त्यातच कसोटी मालिकेआधी वनडे मालिका देखील होणार आहे, त्यामुळे वनडे मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या एखाद्या गोलंदाजाची शमीच्या जागी निवड केली जाऊ शकते, अशी देखील माहिती आहे.

News Title: mohammad shami likely to be ruled out indvsa

महत्त्वाच्या बातम्या-

CNG | सर्वसामान्य जनतेला मोठा फटका; सीएनजीच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ

Uddhav Thackeray | मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धारावी पोलिसांचा धक्का

RCB ला मोठा झटका; लिलावाआधी वाईट बातमी समोर

Malaika Arora सोबत लग्न कधी करणार?, अर्जुन कपूरने अखेर खरं ते सांगून टाकलं

MLA disqualification | “निकाल दिला तर शिंदे अडचणीत येतील, त्यामुळे…”

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now