‘मोदीजी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?’, उद्धव ठाकरे भडकले

On: May 11, 2024 1:39 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान हे दोन दिवसांवर आलं आहे. राज्याचं लक्ष हे चौथ्या टप्प्याच्या मतदानाकडे लागलं आहे. काल मराठवाड्यात उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) सभा पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. काही दिवसांआधी पंतप्रधान मोदींनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही नकली शिवसेना असल्याचं वक्तव्य केलं होतं. मोदींनी केलेलं वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या जिव्हारी लागलेलं पाहायला मिळत आहे. यालाच पलटवार म्हणून मोदीजी तुम्ही तुमचा आत्मा सैतानाला विकला का?, असा तिखट सवाल त्यांनी केला आहे.

“तुम्हाला माफ करू शकत नाही”

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 2014 आणि 2019 या वर्षातील दाखले देत मोदींवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, तुम्ही पंतप्रधान व्हावं म्हणून 2014 आणि 2019 या वर्षात मी सही केली होती. पण तुम्ही जे काल बोलला त्याबद्दल मी तुम्हाला माफ करू शकत नाही, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) संभाजीनगर येथे आयोजित सभेत बोलताना दिसत होते.

“तुम्ही तुमच्या डब्ब्यांना भ्रष्टाचाराची चाके लावलीत”

उपमुख्यमंत्री फडणवीस सांगतात की इंजिनला विकासाचे डब्बे लावले आहेत. अहो विकासाचे इंजिन सोडून द्या. तुमच्या इंजिनला जोडलेल्या डब्याखाली जी भ्रष्टाचाराची चाकं लावली आहेत त्याचं काय?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मोदींना केला. आता ही इंजिनं गुजरातला पाठवून द्या. ज्याअर्थी तुम्ही गद्दार नेले, त्याअर्थी तुम्ही मोदीजींचे इंजिन गुजरातला पाठवून द्या. 10 वर्षे वाफा नाहीतर थापा मारत आहे, असं म्हणत त्यांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधला.

मोदीजी तुम्ही जी भाषा वापरत आहात ती तुम्हाला शोभत नाहीत. महाराष्ट्रात ही भाषा चालणार नाही. कारण हा मराठवाडा साधुसंतांचा आहे. एकमेकाचा आदर करणारा आहे. पंढरपुरात फुगड्या खेळून एकमेकांच्या पाया पडायची आणि शुभेच्छा द्यायची परंपरा महाराष्ट्राची आहे, असं ते म्हणालेत.

तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते ठरवा. तुम्ही नेमकं सर्व फोडलं. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. तरी कधी मला डोळा मारता, तर कधी शरद पवारांना डोळा मारता, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शरद पवार यांना डोळा मारला की या आमच्याकडे. एका ठिकाणी बोलायचं की ही एक नकली शिवसेना आहे. तर दुसरीकडे म्हणायचं की राष्ट्रवादी नकली आहे.  मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा. हे इतके कसे घाबरलेत, कारण त्यांना आता समजलं आहे की हे आता काहीही दिल्ली बघत नाहीत, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

News Title – Uddhav Thackeray On Narendra Modi About Modi Statement Nakli Shivsena

महत्त्वाच्या बातम्या

नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार

रोहित पवारांचा बारामतीत पैसे वाट्ल्याचा आरोप खरा ठरणार? बँक व्यवस्थापकाचं निलंबन

अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

माझे मोदी सरकारबद्दल मतभेद राहणार! पण तरीदेखील महायुतीला मतदान करा; राज ठाकरे

शनीच्या कृपेने 24 तासांत हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब

 

Join WhatsApp Group

Join Now