इशान किशन RBI मध्ये नक्की काय काम करतो? ‘इतक्या’ लाखोंचा पगार मिळतो

On: August 5, 2026 7:05 PM
Ishan Kishan
---Advertisement---

Ishan Kishan | भारतीय क्रिकेटपटू इशान किशन (Ishan Kishan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या फलंदाजीमुळे नव्हे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India – RBI) मधील नोकरीमुळे. पटणा येथील आरबीआय कार्यालयात त्याच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तो कोणत्या पदावर कार्यरत आहे, त्याला ही नोकरी कशी मिळाली आणि त्याचा पगार किती आहे, याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

आरबीआयमध्ये कोणत्या पदावर कार्यरत? :

भारतीय संघ सध्या श्रीलंका (Srilanka) दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत असला तरी इशान किशन या संघाचा भाग नाही. देशांतर्गत क्रिकेटलाही अद्याप सुरुवात नसल्याने मोकळा वेळ मिळाल्यानंतर त्याने पटणा येथील आरबीआय कार्यालयात हजेरी लावली. त्यावेळी त्याने आरबीआयचे अधिकृत ओळखपत्र परिधान केले होते. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्याची भेट घेतली आणि त्याच्यासोबत छायाचित्रेही काढली. ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या नोकरीची चर्चा सुरू झाली.

इशान किशन आरबीआयमध्ये असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) पदावर कार्यरत असून तो ग्रेड ए (Grade A) अधिकारी आहे. त्याची नियुक्ती क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे क्रीडा कोटा (Sports Quota) अंतर्गत करण्यात आली आहे. देशासाठी क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानाच्या आधारे त्याला ही संधी मिळाली आहे.

Ishan Kishan | पगार आणि पुढील क्रिकेटचे वेळापत्रक :

आरबीआयच्या पटणा शाखेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या इशान किशनला दरमहा अंदाजे १ लाख ते १.४ लाख रुपये वेतन मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. बँकेतील पदानुसार मिळणारे वेतन, भत्ते आणि इतर सुविधांचा समावेश करून ही रक्कम निश्चित केली जाते.

सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून थोडा ब्रेक मिळाल्यामुळे इशानने कार्यालयात उपस्थिती लावत वेळेचा योग्य उपयोग केला. मात्र, त्याचा हा विश्रांतीचा कालावधी लवकरच संपणार असून तो दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेत मैदानात उतरणार आहे. 23 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत तो ईस्ट झोन (East Zone) संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

News Title: Ishan Kishan RBI Job Salary

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now