Today Horoscope l मेष:- मनाची चंचलता जाणवेल. कुठल्याही गोष्टीचा फार ताण घेऊ नका. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. सर्व कामे तत्परतेने कराल. योग्य तर्क लावता येईल. शुभ अंक ३, शुभ रंग पांढरा
वृषभ:- फार विचार करू नये. चोरांपासून सावध रहा. अनाठायी खर्च होऊ शकतो. आवडी निवडीवर अधिक भर द्याल. झोपेची तक्रार जाणवेल. शुभ अंक ४, शुभ रंग पोपटी
मिथुन:- चित्त एकाग्र करावे लागेल. मनावर कुठल्या तरी गोष्टीचा ताण राहील. तब्येतीची वेळेवर तपासणी करून घ्यावी. लहानांच्यात लहान होऊन रमाल. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. शुभ अंक ९, शुभ रंग नारंगी
कर्क:- भावनेला आवर घालावी लागेल. पत्नीचे प्रभुत्व राहील. जोडीदाराला प्रगतीचा वाव आहे. कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. पुढील काही तासांत नोकरी आणि व्यवसायात तुमची विशेष प्रगती होईल. शुभ अंक ८, शुभ रंग जांभळा
सिंह:- चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. स्नायू धरणे यांसारखे त्रास संभवतात. वडीलधार्यांचा योग्य तो मान राखाल. प्रवासाची आवड पूर्ण होईल. शुभ अंक ७, शुभ रंग लाल
कन्या:- भावंडांची काळजी लागून राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. घरगुती कामांचा बोझा उचलाल. मैदानी खेळाची आवड पूर्ण कराल. जोडीदाराबाबत गैरसमज करू नयेत. शुभ अंक ५, शुभ रंग हिरवा
तूळ:- घरात काही बदल करावे लागतील. स्थावरची कामे पुढे सरकतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा. भागीदारीतील लाभ उठवाल. शुभ अंक ३, शुभ रंग निळा
Today Horoscope l वृश्चिक:- तुमच्या कामाचा जोम वाढेल. धाडस करताना सारासार विचार करावा. कमी वेळात कामे पूर्ण करण्यावर भर द्याल. मनातील अकारण भीती बाजूस सारावी. भावंडांना मदत करावी लागेल. शुभ अंक ७, शुभ रंग पिवळा
धनू:- हातातील कामात यश येईल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे लागेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. वादविवादात भाग घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे निघतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली वार्ता मिळेल. शुभ अंक ४,शुभ रंग काळा
मकर:- नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कामातील क्षुल्लक अडचणी दूर कराव्यात. प्रवासात योग्य ती काळजी घ्यावी. उत्साहाने कामे हाती घ्याल. उगाच चिडचिड करू नका. शुभ अंक २, शुभ रंग नारंगी
कुंभ:- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. तुमच्यावर नवीन कामांचा भार पडेल. धैर्य व चिकाटी सोडू नका. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. इतरांना तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. शुभ अंक ६, शुभ रंग विटकरी
Today Horoscope l मीन:- घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून वागाल. कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित पूर्ण कराल. हातातील कलेसाठी वेळ द्याल. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. शुभ अंक १, शुभ रंग जांभळा
News Title – Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; धो-धो पाऊस बरसणार
ब्रिजभूषण सिंह यांना झटका; लैंगिक शोषणप्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय
वेबसीरीज पाहून केलं असं काही की संपूर्ण देश हादरला; 15 वर्षांच्या मुलाला…
अजित पवारांची दमबाजी सुरुच… “तुझा असा कंड जिरवेन की”; भरसभेत निलेश लंकेंना दिला दम
कॅटरिना ते अनुष्का ‘या’ अभिनेत्रींचं सर्जरीमुळे झालं आश्चर्यकारक ट्रांसफॉर्मेशन; पाहा फोटो






