‘सुशांतच्या आत्महत्येमागं मोठं षडयंत्र आहे’, आणखी एका व्यक्तीचा दावा

On: December 27, 2022 2:45 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या(Sushant Singh Rajput) आत्महत्येला अडीच वर्षे होऊन गेली तरी हे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. सुशांतच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

नुकताच सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याला ज्या रूग्णालयात नेण्यात आले होते, तेथील कर्मचारी रूकपुमार शाह यांनी धक्कादायक दावा केला आहे. सुशांतची आत्महत्या नसून हत्या आहे, असं शाह यांनी सांगितलं आहे. त्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

त्याचपाठोपाठ आता सुशांतच्या वकिलानेही प्रतिक्रिया दिल्यानं हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं आहे. सुशांतचे वकील विकास सिंह म्हणाले आहेत की, सुशांतचा मृत्यू ही आत्महत्या नाही. सुशांतच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र आहे.

या मृत्यूमागील षडयंत्र सीबीआयचं उघड करू शकते, असंही सिंह म्हणाले आहे. त्यामुळं सुशांतसिंह राजपूत आत्महत्येला एक नवीन वळण आलं आहे.

दरम्यान, आधी रूपकुमार शाह आणि आता विकास सिंह यांनी सुशांतची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा दावा केल्यानं सुशांतच्या चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now