“भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर, मोदींनी देशाचं नेतृत्व योगींकडे द्यावं”

On: September 11, 2024 8:53 AM
Sharad Ponkshe On Hindu Rashtra
---Advertisement---

Sharad Ponkshe | प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी हिंदू राष्ट्रबाबत एक मोठं विधान केलं आहे. सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं. यामुळे शरद पोंक्षे आता चर्चेत आले आहेत. (Sharad Ponkshe)

“हजारो वर्षांपासून भारतावर अनेकांची आक्रमण झाली, पण कुणालाही हिंदू धर्म संपवता आला नाही. पण या खुळचट कल्पनेत कायम राहू नये.”, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता देशाचं नेतृत्व हे योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं, असं स्पष्ट मत मांडलं.

“मोदींनी देशाचं नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं”

शरद पोंक्षे यांनी हिंदू राष्ट्रावर आणि त्याच्या भवितव्यावरही स्पष्ट मत मांडलं आहे. त्यांचं हे वक्तव्य आता जोरदार चर्चेत आलं आहे. सांगलीत एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिंदू धर्मासाठी भारत हा एकच देश आहे. इथून हाकललं तर आसरा घ्यायला आपल्याला दूसरा राष्ट्र नाही, असंही शरद पोंक्षे म्हणाले आहेत.

“भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2027-28 पायउतार व्हावे आणि देशाचं नेतृत्व योगी आदित्यनाथ यांच्याकडे द्यावं.”, असं थेट मत शरद पोंक्षे यांनी मांडलं आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ यामुळे आता मळमळायला लागलं आहे, असंही ते (Sharad Ponkshe)म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

“..त्या क्षणी आपला देश संपेल”

“आज हिंदूंना संपवण्यासाठी जाती-जातींमध्ये विष पेरलं जातंय. आपण यापासून दूर राहून सनातनी संस्कृती टिकवायला हवी. ज्या क्षणी आपण 49 टक्क्यांवर आलो त्या क्षणी आपला देश संपेल. पण घाबरू नका, हे काही शक्य नाही. निसर्गाने ज्याला बनवलंय त्याला कुणी संपवू शकत नाही. हा निसर्गच निसर्गाला संपवेल, माणूस नाही.”, असं शरद पोंक्षे(Sharad Ponkshe)म्हणाले.

“भारतावर हजारो वर्षांपासून, चौथ्या पाचव्या शतकापासून अनेक आक्रमणं झाली. पण कुणाच्यात धमक झाली नाही हिंदू राष्ट्र संपवण्याची. कुणालाही जमलं नाही. ग्रीक, पोर्तुगीज, मुघल, ब्रिटिशांना, शकांनी, तुर्कांनीही आक्रमण करून त्यांचा देश बनवता आला नाही, कधी ते शक्यही होणार नाही. पण म्हणून या खुळचट कल्पनेत राहू नये. अखंड सावध असावे असं समर्थ म्हणतात.”, असं शरद पोंक्षे यांनी म्हटलं.

News Title – Sharad Ponkshe On Hindu Rashtra

महत्त्वाच्या बातम्या-

आज गौरी पूजन, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची पद्धत

लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार, मिळणार अमाप पैसा!

मुलीच्या लग्नासाठी सरकार देणार पैसे, ‘कन्यादान योजना’ आहे तरी काय?

जगभरात BCCIची नाचक्की! वॉशरूमच्या पाण्यापासून बनवलं जेवण?

महायुतीला झटका देणारं सर्वेक्षण समोर!

Join WhatsApp Group

Join Now