साहेबांना म्हशी वळायच्या आहेत का? त्यांचा धंदाच हाच आहे; शरद पवारांवर ‘या’ नेत्यानी केली टीका

On: April 26, 2024 1:41 PM
Maharashtra Politics
---Advertisement---

Sharad Pawar l लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. अशातच भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांवर खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. शरद पवार तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतात, पण ती किल्ली अजित पवारांना देत नाहीत असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.

आम्ही कधी प्रपंच म्हातारा झाल्यावर करायचा का? :

भाजप नेते सदाभाऊ खोत म्हणाले प्रचार सभेत म्हणाले की, मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हातात प्रपंच देत असतो आणि गप्प बसतो. पण हा म्हातारा लय खडूस आहे. तिजोरीची किल्ली कंबरेला लावूनच कायम हिंडत आहे. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे देखील झाले आहेत.

मग अजितदादांच्या लक्षात आले की, हे म्हातारं कंबरेची किल्ली काय काढत नाही! म्हणून अजितदादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय मी काय राहणार नाही. आता आम्हाला आमचा प्रपंच करू द्या, आम्ही कधी प्रपंच म्हातारा झाल्यावर करायचा का? या कारणामुळे अजित दादा विकासासाठी महायुतीमध्ये आले आहेत.

Sharad Pawar l साहेबांना म्हशी वळायच्या आहेत का? :

माढा लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचार सभेला भाजपनेते सदाभाऊ खोत उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी या प्रचारसभेत शरद पवारांचा उल्लेख ‘म्हातारा’ असा केला आहे.

या मतदारसंघात शरद पवारांविषयी बऱ्याच गोष्टी ऐकायला येतील. साहेबांचे वय 84 म्हणून ते 84 सभा घेणार अशा चर्चा देखील सध्या सुरू आहेत. पण तुम्हीच मला सांगा सध्या साहेबांना काम काय आहे? साहेबांना म्हशी वळायच्या आहेत का? की जनावारांना पाणी पाजायच आहे? सध्या त्यांचा धंदाच हा आहे. या वयात देखील आमच्या सारख्यांन संधी दिली जात नाही अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे.

News Title : Sadabhau Khot Statment On Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या –

स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; यूपीएससी अंतर्गत तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु

‘या’ बड्या नेत्याचा शिंदेसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र

…त्या वक्तव्यावरून अजितदादांना दिलासा तर शरद पवार गटाला झटका

बारावीच्या निकालाआधी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

‘मला सिगारेट ओढायला प्रचंड आवडतं, दिवसाला..’, विद्या बालनचा चकित करणारा खुलासा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now