पुण्यातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला केली स्थानिक नेत्यांनी मदत!

On: October 3, 2024 4:06 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Pune Rape News l पुण्यात आठ वर्षीय दोन अल्पवयीन मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता या घटनेची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.

आरोपीला पळून जाण्यासाठी स्थानिक नेत्यांनी केली मदत :

पुण्यातील शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या धक्कादायक प्रकरणातील आरोपीला काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पळून जाण्यात मदत केल्याचा धक्कादायक आरोप गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वानवडी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले आहे की, घटना घडल्यानंतर आरोपीला तेथील काही स्थानिक नेत्यांनी पळून जाण्यात मदत केली आहे.

मात्र राज्यातील अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. तसेच अशा आरोपीवर कडक कारवाई देखील केली जाईल. याशिवाय आरोपीला मदत करणाऱ्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Pune Rape News l पोलिसांनी आरोपीला केले अटक :

पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत आणखी काही पीडित मुली आहेत का? याचा देखील तपास वानवडी पोळी करत आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी संजय जेटींग रेड्डी (वय 45, रा. वैदुवाडी, हडपसर) या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील पीडीत मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या पालकांना सांगितलं. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मात्र या घटनेमुळे राज्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

News Title – Sexual assault by school bus driver in pune

महत्वाच्या बातम्या-

नवरात्रोत्सवात शारीरिक संबंध ठेवणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

‘हिंदू समाज हा महामूर्ख’ संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदेंना झुकतं माप; भाजपमध्ये नाराजीचे सुर?

खुशखबर ! महिंद्रा थार रॉक्सची बुकिंग सुरु; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

संतापजनक! पुण्यात दोन चिमुरड्यांवर स्कुल बस ड्रायव्हरने केला अत्याचार

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now