Vidhansabha 2024 l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच आता सर्वच पक्षांच्या उमेदवारांची नावे देखील जाहीर होत आहे. नुकतंच राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.
बड्या नेत्यांना मिळाली उमेदवारी :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा नुकतीच केली आहे. तसेच यामध्ये राज्यात चर्चेत असणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाने विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये आता तिसऱ्यांदा हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे असा सामना रंगणार असल्याचं दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. मात्र या पहिल्या यादीमध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा सर्वात जास्त समावेश असल्याचं दिसत आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांना परळीतून तर दिलीप वळसे पाटील यांना आंबेगावमधून याशिवाय आशुतोष काळे यांना कोपरगाव मतदारसंघातूनउमेदवारी देण्यात आली आहे.
Vidhansabha 2024 l हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी निश्चित :
गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता इंदापूरमध्ये शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटलांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच इंदापूर मतदारसंघ हा सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहे.
मात्र आता देखील अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांना तिकीट दिल्याने इंदापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
News Title : Maharashtra vidhansabha 2024
महत्वाच्या बातम्या –
लवकरच Mini Fortuner कार बाजारात धुमाकूळ घालणार; जाणून घ्या किंमत?
दिवाळीला अयोध्येत घ्या रामलल्लाचं दर्शन; सर्वात स्वस्तातलं टूर पॅकेज मिळेल ‘इथे’
ठरलं! अजित पवार बारामतीतून लढणार, NCP ची पहिली यादी जाहीर






