Ayodhya Tour Package | दिवाळी हा भारतातला सर्वात मोठा सण आहे. रामायणानुसार, प्रभू श्रीराम माता सीता आणि त्यांचा भाऊ लक्ष्मणासह लंका जिंकून अयोध्येला परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या दणाणून गेली होती आणि या तिघांचेही दिव्यांच्या रोषणाईने स्वागत करण्यात आले. हा दिवस भगवान श्रीरामाच्या विजयाचा आनंद म्हणूनही साजरा केला जातो. प्रत्येकवर्षी दिवाळीत अयोध्येत मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात येते. दिवाळीला अयोध्येत अनेक भव्य कार्यक्रम देखील होत असतात. यावर्षी तर अयोध्येतील नुकत्याच उद्घाटन झालेल्या राम मंदिरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी असेल. (Ayodhya Tour Package )
दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला दिवाळीच्या खास मुहूर्तावर भगवान श्रीरामाचं अयोध्येत दर्शन घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायद्याची ठरेल. या लेखात IRCTCच्या एका अतिशय अप्रतिम टूर पॅकेजबद्दल माहिती देण्यात आली आहे.
IRCTC ‘राम लल्ला दर्शन’ टूर पॅकेजबद्दल जाणून घ्या-
या टूर पॅकेजअंतर्गत तुम्हाला अयोध्येत भगवान श्रीरामाचं दर्शन घेता येणार आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक उत्तम सुविधाही मिळत आहेत. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
IRCTC च्या या टूर पॅकेजचे नाव “राम लल्ला दर्शन” अयोध्या असं आहे. त्यांचा पॅकेज कोड NDR012 आहे. हे पॅकेज एकूण 1 रात्र आणि 2 दिवसांसाठी आहे. यामध्ये तुमचा प्रवास ट्रेनने होईल. याशिवाय, तुम्हाला कॅबने इतर ठिकाणी नेले जाईल. येत्या 26 ऑक्टोबरपासून हे टूर पॅकेज दिल्लीपासून सुरू होत आहे. (Ayodhya Tour Package )
या टूर पॅकेज अंतर्गत IRCTC हॉटेलसह तुमच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील करणार आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला 16 हजार 20 रुपये दर भरावे लागेल. दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला 11 हजार 40 रुपये शुल्क आहे. जर तुम्ही तीन लोकांसह प्रवास करत असाल तर तुमचे प्रति व्यक्ती शुल्क हे 9 हजार 510 रुपये आकारण्यात येईल. अशाप्रकारे जास्त व्यक्ती असल्यास जास्त प्रमाणात सूट मिळणार आहे. (Ayodhya Tour Package )
News Title : Ayodhya Tour Package IRCTC
महत्वाच्या बातम्या-
ठरलं! अजित पवार बारामतीतून लढणार, NCP ची पहिली यादी जाहीर
अजित पवारांविरोधात ‘हा’ युवा नेता मैदानात उतरणार?
दिवाळीपूर्वीच सोन्याचा कहर, 10 ग्रॅमचे दर ऐकून बसेल धक्का!
“विजयाचा गुलाल नाय उधळला तर फाशी घेऊन मरेन”; शहाजीबापू यांचं मोठं वक्तव्य






