‘फक्त दहा चित्रपट करणाऱ्या कंगनाला पद्मश्री मिळतो कसा’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा राग अनावर

On: December 26, 2022 5:51 PM
---Advertisement---

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत असते. यामुळं बऱ्याचदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. परंतु तरीही कंगना न घाबरता कोणत्याही विषयावर बिनधास्त बोलत असते.

नुकतीच कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी कंगनावर टाॅलिवूड अभिनेत्रीनं निशाणा साधल्यानं कंगना चर्चेत आली आहे. कंगनाला पद्मश्री पुरस्कार दिल्यावरून अभिनेत्री जयसुधा यांनी सरकार आणि कंगनाला सुनावलं आहे.

जयसुधा म्हणाल्या आहेत की, फक्त दहा सिनेमे करून कंगनाला पद्मश्री मिळतो कसा?, आमची हयात गेली तरी आम्हाला अजून हा पुरस्कार मिळाला नाही, अशी मनातली खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.

प्रत्येकवेळी सरकार टाॅलिवूडच्या कलाकारांना का डावलते, असा सवालही जयसुधा यांनी उपस्थित केला आहे. जयसुधा यांनी ही खंत व्यक्त केल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वीही टाॅलिवूडच्या कलाकारांनी पद्मश्री पुरस्कारासाठी टाॅलिवूडच्या कलाकारांना डावल्यानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now