प्राजक्ताच्या ‘त्या’ पोस्टवर संतापले चाहते, म्हणाले तू पण…

On: December 3, 2022 1:44 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali) मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरली आहे. तिच्या अनेक मालिका, चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती सोशल मीडियावर हटके फोटो, व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. या फोटो-व्हिडीओंवर चाहत्यांचा लाईक्स-कमेंट्सचा पाऊस सुरू असतो.

पण नुकतंच प्राजक्तानं बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत तिनं हाय स्टाईलचा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तसेच या ड्रेसमध्ये तिनं बोल्ड लूक दिले आहेत. परंतु हे फोटोशूट तिला महागात पडत आहे.

तिनं या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळं तर चाहते जास्तच संतापले आहेत. कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं आहे की, जर तुमचे शरीर चांगल्या शेपमध्ये असेल तर दाखवायला हरकत नाही. या कॅप्शनमुळं तिला आता ट्रोलींगचा सामना करावा लागत आहे.

एका नेटकऱ्यानं या पोस्टला कमेंट केली आहे की, तुला सईची सावली पडली. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, काही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्र्या होत्या ज्या आवडायच्या, त्यापैकी तू देखील होती, पण आता तू पण लाज सोडली. तसेच काहीजण म्हणत आहेत की, तुझ्या विषयीचा आदर कमी होत आहे.

दरम्यान, तिच्या ‘रानबाजार’ या वेबसिरीजमधील तिच्या बोल्ड लुकमुळंही तिच्यावर प्रचंड टीका झाली होती. आता तिच्या या बोल्डलुकमुळं नेटकऱ्यांनी तिला पुन्हा धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now