…म्हणून निर्मला सीतारामन यांनी पहिली घोषणा बिहारसाठी केली; नितीशकुमारांनी डाव साधला

On: February 1, 2025 2:13 PM
Budget 2025 Big Announcements for Bihar State
---Advertisement---

Budget 2025 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला असून यात बिहारसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेषतः मखाना मंडळाच्या स्थापनेची घोषणा ही बिहारच्या शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. (Budget 2025)

अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सरकार बिहारमध्ये अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन या राष्ट्रीय संस्थेची स्थापना करेल. बिहारसाठीच पहिल्यांदा घोषणा होताच विरोधकांनी सुद्धा घोषणाबाजी केली.

बिहारमध्ये स्थापन होणार मखाना मंडळ

अर्थमंत्र्यांनी बिहारमध्ये “माखना मंडळ” स्थापन करण्याची घोषणा केली आहे. यामुळे मखाना (Fox Nut) उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

बिहारसाठी राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान संस्था

यासोबतच बिहारमध्ये “राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था” स्थापन केली जाणार आहे. यामुळे कृषी उद्योगाला चालना मिळेल आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने स्थानिक शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

नवीन रेल्वे आणि जलवाहतूक प्रकल्प अपेक्षित

बिहारसाठी नवीन रेल्वे मार्ग, जलवाहतुकीच्या सुविधा आणि हवाई वाहतुकीचा विस्तार होण्याची शक्यता आहे. याशिवाय, नवीन IIT आणि NIT संस्थांच्या स्थापनेसाठीही मागणी करण्यात आली आहे.

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्ष

बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार असल्याने मोदी सरकारने अर्थसंकल्पात बिहारकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसांपूर्वी बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त आर्थिक मदत, नवीन द्रुतगती मार्ग आणि हायस्पीड कॉरिडॉरसाठी मागणी केली होती, त्यावरही सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Budget 2025)

Title : Budget 2025 Big Announcements for Bihar State

Join WhatsApp Group

Join Now