बोपदेव घाट गँगरेप प्रकरणी हादरवणारा खुलासा समोर; पीडितेला खुनाची धमकी दिली अन्…

On: October 5, 2024 12:34 PM
Bopdev Ghat Gang Rape case big revelation of victim  
---Advertisement---

Bopdev Ghat Gang Rape | देशभरात सध्या महिलांबाबत धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे देशासह राज्यातही महिलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात देखील महिलांसोबत झालेल्या अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.अशात पुण्यातून एक खळबजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील बोपदेव घाटात काल 4 ऑक्टोबररोजी एक धक्कादायक घटना घडली. (Bopdev Ghat Gang Rape )

बोपदेव घाट परिसरातून सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बोपदेव घाटामध्ये एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. (Bopdev Ghat Gang Rape ) या तरुणीचं अपहरण करून तिघा मित्रांनी तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

या घटनेत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार, तरुणीला मित्राचा खून करण्याची धमकी देत तीन नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालंय. मित्राचा खून करण्याची धमकी देत तिला कपडे काढायला लावून तिच्यावर अत्याचार करण्यात आला, असं पीडित तरुणीने तिच्या जबाबात सांगितलंय.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय तरुणी ही आपल्या तरुण मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. गुरुवारी रात्री उशिरा ती आणि तिचा मित्र 11 वाजता घटनास्थळी गेले होते. तेथे तासाभरात तिघे जण आले आणि त्यांनी तरुणाला बांधून तिच्यावर अत्याचार केले. यावेळी मित्राचा खून करण्याची धमकीही तरुणीला देण्यात आली. तरुणीने विरोध करताच बांबूने पायावर मारहाण देखील करण्यात आली. तीन आरोपींपैकी दोघांकडे चाकूसारखी शस्त्रे होती, असं एफआयआरमध्ये म्हणण्यात आलंय.

नराधमांनी चाकूचा धाक दाखवत मुलीवर सामूहिक अत्याचार केला. अगोदर आरोपींनी तरुणीसोबत असलेल्या मुलाचा शर्ट काढला. त्याचे पाय बेल्टने बांधून ठेवले आणि गाडीची चावी व मोबाइल देखील काढून घेतला. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तिघे नराधम हे त्या ठिकाणावरून पळून गेले. नंतर मुलीने बांधून ठेवलेल्या मित्राला सोडवले. (Bopdev Ghat Gang Rape )

पीडित तरुणीचा धक्कादायक खुलासा

या सर्व घटनेनंतर पीडित तरुणी आणि तिच्यासोबत असलेला तरुण मित्र दोघांनीही दुचाकीवरून थेट रुग्णालय गाठलं. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिने पोलिसांना जबाब दिला. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समजते. या सर्व घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अशा अनेक घटना घडत आहेत. यामुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे. (Bopdev Ghat Gang Rape )

News Title –  Bopdev Ghat Gang Rape case big revelation of victim  

महत्त्वाच्या बातम्या-

खरेदीदारांना झटका! सोनं गेलं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

राज्यातील विद्यार्थीनींच्या शिष्यवृत्तीमध्ये केली मोठी वाढ; किती रुपये मिळणार?

धक्कादायक! SBI ची बनावट शाखा उघडून ग्राहकांची लाखोंची फसवणूक

बिग बॉसच्या घरात अरबाजची एन्ट्री; निक्की म्हणाली…

बोपदेव घाटातील गँगरेप प्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ CCTV फूटेजने खळबळ

Join WhatsApp Group

Join Now