खरेदीदारांना झटका! सोनं गेलं 80 हजारांवर?, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

On: October 5, 2024 12:09 PM
Gold-Silver Rate Today 5 October 2024
---Advertisement---

Gold-Silver Rate Today | नवरात्रीमध्ये मौल्यवान धातू सोन्याने दरवाढीचे चांगलेच रंग दाखवले आहेत. या महिन्यात तर सोन्याने दरवाढीचे सर्वच विक्रम मोडले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात खरेदीदारांना मोठा झटका बसला आहे. सोन्याची किंमत पाहून ते खरेदी करावं की नाही?, असा प्रश्न ग्राहकांना पडतोय. चांदी तर आता 1 लाखाच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत चांदी 1 लाखांचा टप्पा गाठणार, अशा चर्चा आहेत. (Gold-Silver Rate Today )

गेल्या आठवड्यात सोन्याने 1500 रुपयांचा टप्पा गाठला होता. तर, या आठवड्यात सोन्याच्या दरात हजार रुपयांची वाढ झाली. महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 ऑक्टोबररोजी 330 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 2 ऑक्टोबर रोजी त्यात 540 रुपयांची दरवाढ झाली. 3 ऑक्टोबर रोजी सोने 110 रुपयांनी वधारले. 4 ऑक्टोबर रोजी त्यात पुन्हा वाढ झाली.

आज 5 ऑक्टोबररोजी देखील सोनं महाग झालं आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,360 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुढील काही दिवसांत सोनं 80 हजारांवर जाणार, असा अंदाज आता वर्तवला जात आहे.

तर, चांदीचे दर सध्या स्थिर आहेत. 29 सप्टेंबरपासून चांदीची विश्रांती सुरु आहे. किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे. दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

14 ते 24 कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,964, 23 कॅरेट 75,660, 22 कॅरेट सोने 69,583 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 56,973 रुपये, 14 कॅरेट सोने 44,439 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 5 October 2024

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील विद्यार्थीनींच्या शिष्यवृत्तीमध्ये केली मोठी वाढ; किती रुपये मिळणार?

धक्कादायक! SBI ची बनावट शाखा उघडून ग्राहकांची लाखोंची फसवणूक

बिग बॉसच्या घरात अरबाजची एन्ट्री; निक्की म्हणाली…

बोपदेव घाटातील गँगरेप प्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ CCTV फूटेजने खळबळ

महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा! मोदींची मुंबईत तर राहूल गांधींची कोल्हापुरात तोफ धडाडणार

Join WhatsApp Group

Join Now