Fake SBI Branch | एसबीआयची नवीन बनावट शाखा उघडून ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. रातोरात SBI ची नवीन ब्रँच सुरू झाली. परीक्षेविनाच तातडीनं नियुक्त्या देखील करण्यात आल्या. इतकंच नाही तर, लोकांनी या शाखेत पैसे देखील गुंतवले. मात्र, जेव्हा यामागील सत्य समोर आलं तेव्हा मात्र ग्राहकांच्या पायाखालची जमीनच जणू सरकली. (Fake SBI Branch)
अगदी फिल्मी स्टाइलमध्ये हा सर्व प्रकार करण्यात आला. या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा रंगली आहे. ही धक्कादायक घटना छत्तीसगडमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट शाखा उघडून ग्राहकांची फसवणूक
आरोपींनी कोरबा आणि कवर्धा परिसरातील लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची माहिती उघड झाली आहे. या सर्व बनावट शाखेचा पर्दाफाश झाल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध आता पोलिस करत आहेत. मिळालेल्या महितीनुसार, मनोज अग्रवाल नामक व्यक्ती कियोस्क शाखा उघडण्यासाठी अर्ज घेऊन गेला असताना तिथे SBI ची शाखा सुरू झाल्याचं आढळून आलं. (Fake SBI Branch)
यादरम्यान चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. बँकेची ही शाखाच बनावट असल्याचं दिसून आलं. याबाबत मनोज अग्रवाल नामक व्यक्तीने ताबडतोब याची माहिती डभरा ब्रांचमधील अधिकाऱ्यांना दिली. या व्यक्तीने सतर्कता दाखवल्याने या टोळीचा पर्दाफाश झाला.
छत्तीसगडमध्ये घडला हा प्रकार
या बनावट शाखेत बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती देखील केली गेली. त्यांना शाखेतून ट्रेनिंग दिलं जात होतं. जेव्हा पोलिसांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या बनावट शाखेवर छापा टाकला. या शाखेचा मॅनेजर आता फरार झाला आहे. तर, पोलिसांनी कंप्युटर सिस्टीम, मोबाईल आणि हार्डडिस्क ताब्यात घेतली आहेत. पोलिसांनी बनावट सील आणि कागदपत्र ताब्यात घेतले आहेत.
नोकरी देण्याच्या बहाण्याने शाखेकडून लोकांची फसवणूक केली जात होती. लोकांकडून UPI पेमेंटने पैसे घेतले जात होते. नोकरीसाठी आणखी लोकांना जोडण्यासाठी या टोळीनं दिशाभूल केली. रेखा साहू आणि मनधीर दास अशी दोन आरोपींची नावं समोर आली आहेत. या प्रकरणाची आता जोरदार चर्चा रंगली आहे. (Fake SBI Branch)
News Title – Fake SBI Branch robbed customers
महत्त्वाच्या बातम्या-
बिग बॉसच्या घरात अरबाजची एन्ट्री; निक्की म्हणाली…
बोपदेव घाटातील गँगरेप प्रकरणी मोठी अपडेट; ‘त्या’ CCTV फूटेजने खळबळ
महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा! मोदींची मुंबईत तर राहूल गांधींची कोल्हापुरात तोफ धडाडणार
गुड न्यूज! राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 4000 रुपये
सुख-समृद्धीने जीवन फुलेल, देवी चंद्रघंटा आज ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!






