साई पल्लवीच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज

On: December 12, 2022 4:04 PM
---Advertisement---

मुंबई| दाक्षिणात्य चित्रपटांची(South Moveis) भारतभर मोठी क्रेझ आहे. बाॅलिवूडच्या(Bollywood) कलाकारांपेक्षा साऊथच्या कलाकारांना भारतीयांकडून मोठी पसंती मिळत आहे. त्यातच साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवीनं(Sai Pallavi) आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

साई पल्लवीचे असंख्य चाहते आहेत. तिचे सोशल मीडियावर 6 मिलियन पेक्षा जास्त फाॅलोअर्स आहेत. साई पल्लवीला बाॅलिवूडमध्ये पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत. अशातच तिच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

साई पल्लवी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अल्लू अरविंद या निर्मात्याच्या ‘रामायण'(Ramayan) या चित्रपटातून साई पल्लवी बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, अशा चर्चा आहेत. परंतु निर्मात्यांनी याबदद्ल अद्याप कोणताही खुलासा केला नाही.

या चित्रपटाची स्क्रिप्ट चार-पाच वर्षांपासून तयार आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अनेक सुपरस्टार कलाकारांची नावं समोर येत आहेत. नुकतंच रणबीर कपूर आणि दीपिकाची या चित्रपटासाठी वर्णी लागणार असल्याच्याही चर्चा आहेत.

साई पल्लवीच्या भूमिकेबद्दल निर्मात्यांकडून काहीही सांगण्यात आलं नाही. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होईपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं निर्मात्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रामायण या चित्रपटाची शुटींग पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे. हा प्रोजेक्ट अत्यंत महागडा असल्याच्याही चर्चा आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now