अंबरनाथमध्ये शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी! शिक्षिका जखमी

On: February 1, 2025 11:23 AM
Crime News
---Advertisement---

Crime News l अंबरनाथमध्ये महिला आणि पुरुष शिक्षकांमध्ये शाळेच्या बाहेरच फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत महिला शिक्षिका जखमी झाली असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका पुरुष शिक्षकाने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप या महिला शिक्षिकेने केला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पश्चिम येथील जावसई फुलेनगर भागात प्रियदर्शनी हिंदी शाळा आहे. या शाळेत अनिता गुप्ता या २९ वर्षांपासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. २९ जानेवारीला अनिता यांनी त्यांच्या वर्गातील मुलांना पीटीच्या तासासाठी बाहेर खेळण्यासाठी सोडले असताना, शिक्षक एकादशी राम यांनी या मुलांचा व्हिडिओ काढला, असा आरोप अनिता यांनी केला आहे.

कानशिलात लगावल्याने झाली हाणामारी :

शाळा सुटल्यानंतर अनिता या शाळेबाहेर पालकांशी बोलत असताना एकादशी राम तिथे आले आणि त्यांनी अनिता यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. यावरून अनिता यांनी एकादशी राम यांच्या कानशिलात लगावली.

यानंतर दोन्ही शिक्षकांमध्ये शाळेबाहेरच हाणामारी झाली. याआधी मुख्याध्यापकांनी अनिता यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला होता. तसेच शाळा सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जात असल्याचा आरोपही अनिता गुप्ता यांनी केला आहे.

Crime News l दोघांविरोधात गुन्हा दाखल :

अनिता यांचे हे आरोप एकादशी राम यांची पुतणी अंजली जैस्वार यांनी फेटाळून लावले आहेत. या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मारहाणीत अनिता यांच्या चेहऱ्याला आणि डोळ्याला दुखापत झाली असून, त्यांच्या फिर्यादीवरून अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात एकादशी राम आणि अंजली जैस्वार यांच्याविरोधात विनयभंग आणि दुखापत करणे या कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

News Title : Ambernath-Teachers-Fight-Outside-School-Lady-Teacher-Injured

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now