Bhandup News l मुंबईतील (Mumbai) भांडुपमध्ये (Bhandup) एका नऊ वर्षीय शाळकरी मुलीला एका अज्ञात व्यक्तीने शाळेच्या मैदानातून निर्जनस्थळी नेत इंजेक्शन (Injection) दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही मुलगी भांडुपमधील एका नामांकित शाळेत शिकत असून, ३१ जानेवारी रोजी शाळेच्या मैदानात खेळत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळांमध्ये (Schools) आपल्या मुलींच्या सुरक्षेचा (Safety) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमके काय घडले? :
३१ जानेवारी रोजी ही मुलगी शाळेच्या मैदानात खेळत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिला गाठले आणि शाळा परिसरातीलच एका निर्जनस्थळी (Isolated Place) नेले. काही वेळानंतर मुलगी वर्गात परतली. मात्र, आपल्याला एका व्यक्तीने इंजेक्शन दिल्याचे तिने सांगितल्याने एकच खळबळ उडाली. पालकांनी या प्रकाराबद्दल कळताच तातडीने मुलीला उपचारासाठी (Treatment) जवळच्या रुग्णालयात (Hospital) नेले आणि भांडुप पोलिस ठाण्यात (Bhandup Police Station) तक्रार दाखल केली.
Bhandup News l तपासासाठी चार पथके, सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) अनिर्णायक :
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भांडुप पोलिसांनी तपासासाठी चार पथके (Teams) नेमली आहेत. शाळा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र, त्यात काहीही संशयास्पद (Suspicious) आढळले नसल्याचे सांगण्यात आले. या फुटेजमध्ये मुलगी शाळेच्या मैदानात खेळताना आणि त्यानंतर वर्गात मित्र-मैत्रिणींसोबत खेळताना दिसते. दरम्यान, मुलीची रक्तचाचणी (Blood Test), एक्स-रेसह (X-Ray) सर्व वैद्यकीय चाचण्या (Medical Tests) करण्यात आल्या असून, प्राथमिक अहवालानुसार (Primary Report) सर्व रिपोर्ट नॉर्मल (Normal) आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर :
देशभरात अल्पवयीन मुलींवर (Minor Girls) होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत असतानाच, भांडुपमध्ये घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. आता शाळेत तरी आपल्या मुली सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न पालकांना पडला आहे.
या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे शाळांमध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा प्रशासनाने (School Administration) याबाबत अधिक सतर्क राहून, सुरक्षा व्यवस्था (Security System) अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.






