Women’s T20 World Cup l पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये भेदभाव असल्याच्या चर्चा अनेकदा होत असते. त्यामुळे महिला क्रिकेटपटूंनाही पुरुष क्रिकेटपटूं इतकच मानधन मिळायला हवं असा मुद्दा अनेकदा मांडण्यात आला आहे. आता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने भेदभाव दूर करत महिला T20 विश्वचषकासाठी पुरुषांच्या T20 विश्वचषकाप्रमाणेच बक्षीस रक्कम जाहीर केले आहे.
ICC ने बक्षिसाच्या किमतीत केली वाढ :
या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा करताना, ICC ने सांगितले की या स्पर्धेसाठी एकूण US $ 7,958,080 म्हणजेच सुमारे 66 कोटी 30 लाख रुपये बक्षीस म्हणून ठेवण्यात आले आहे, जे मागील वेळेच्या म्हणजेच 2023 महिला T20 विश्वचषकाच्या दुप्पट आहे.
आता 2024 महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या संघाला 2.34 दशलक्ष अमेरिकन डॉलर (सुमारे 20 कोटी रुपये) दिले जाणार आहेत. त्याच वेळी, 2023 महिला टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला फक्त 1 दशलक्ष यूएस डॉलर (सुमारे 8.5 कोटी रुपये) बक्षीस देण्यात आले होते. यावेळी म्हणजे 2024 मध्ये विजेत्या संघाला 134 टक्के अधिक बक्षीस रक्कम मिळणार आहे.
Women’s T20 World Cup l 03 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला होणार सुरुवात :
याशिवाय उपविजेत्या संघाला 1.17 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपये दिले जाणार आहेत. तर उपविजेत्या संघालाही गतवेळच्या तुलनेत 134 टक्के अधिक पैसे मिळणार आहेत. याशिवाय इतर संघांना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.
अशातच आता महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा 03 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे, तर अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 साखळी सामने खेळवले जाणार आहेत. याशिवाय दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम फेरी होणार आहे. ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाईल, जी यापूर्वी बांगलादेशमध्ये खेळली जाणार होती. बांगलादेशातील खराब परिस्थितीमुळे आयसीसीने ही स्पर्धा यूएईला हलवली आहे.
News Title : Women’s T20 World Cup Prize Money
महत्वाच्या बातम्या-
… तर फडणवीसांना गुडघे टेकवायला लावणारचं; कोणी दिला थेट इशारा
आज उभयचरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; ‘या’ राशी होणार धनवान
आधारकार्ड वरील नाव बदलायचंय? तर लागतील ही कागदपत्रं
बाप्पा गेले गावी, राज्यात पावसाचं होणार पुन्हा आगमन; कुठे-कुठे बरसणार?
“राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवे”; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य






