MRI Scan Death l एमआरआय स्कॅनिंग दरम्यान 61 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आधरप्रदेशमध्ये समोर आली आहे. मृत महिलेला हृदयासंबंधी समस्या होत्या आणि तिच्या हृदयात पूर्वीच पेसमेकर बसवण्यात आला होता. मात्र, डायग्नोस्टिक सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी योग्य खबरदारी न घेतल्याने हा अपघात घडल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे.
पेसमेकरची माहिती नसल्याने जीव गमवावा लागला? :
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला अनेक दिवसांपासून थकवा आणि अस्वस्थता जाणवत होती, त्यामुळे डॉक्टरांनी तिला एमआरआय करण्याचा सल्ला दिला. मात्र, स्कॅनिंग प्रक्रियेदरम्यान तिची तब्येत अचानक बिघडली आणि काही वेळातच तिचा मृत्यू झाला.
महिलेच्या पतीच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांना तिच्या शरीरात पेसमेकर असल्याची माहितीच नव्हती. त्यामुळे त्यांनी कोणतीही खबरदारी न घेता सरळ एमआरआय प्रक्रिया सुरू केली.
MRI Scan Death l पतीने Diagnostic Centre वर गंभीर आरोप :
महिलेच्या पतीने सांगितले की, एमआरआय स्कॅनिंग सुरू असताना पत्नीची प्रकृती ठणठणीत होती. मात्र, जसजशी प्रक्रिया सुरू झाली, तसा तिला त्रास जाणवू लागला. त्यांनी कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली, मात्र टेक्निशियनने दुर्लक्ष केले आणि “मशीनमध्ये असताना हालचाल करू नका” असे सांगण्यात आले.
स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मशीन बाहेर आले, तेव्हा महिला मृतावस्थेत आढळली. त्यामुळे कुटुंबियांनी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान तज्ज्ञांच्या मते, MRI सामान्य लोकांसाठी सुरक्षित आहे. मात्र, जे रुग्ण शरीरात मेटल प्लेट्स किंवा पेसमेकर बसवलेले आहेत, त्यांनी आधीच डॉक्टर आणि टेक्निशियनला याची माहिती द्यावी.
MRI करताना विशेष खबरदारी घेतल्यास पेसमेकर किंवा इतर मेटल इम्प्लांट असलेल्या रुग्णांसाठीही ही प्रक्रिया सुरक्षित होऊ शकते. मात्र, या प्रकरणात डायग्नोस्टिक सेंटरकडून प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही का? याची चौकशी होणे आवश्यक आहे.






