हृतिक-सुझानच्या घटस्फोटाचे गूढ उकलले! १२ वर्षांनंतर भावाने अखेर मौन सोडलं

On: April 1, 2026 1:56 PM
Hrithik Roshan
---Advertisement---

Hrithik Roshan | बॉलिवूडमधील चर्चित जोडप्यांपैकी एक असलेले हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सुझान खान (Sussanne Khan) यांच्या घटस्फोटाची चर्चा आजही होत असते. 2000 साली लग्नबंधनात अडकलेल्या या दोघांनी 14 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर 2014 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने त्या वेळी चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. या दोघांना रेहान आणि हृधान अशी दोन मुलं आहेत.

घटस्फोटानंतरही दोघांमधील संबंध मात्र कटु झाले नाहीत. उलट आजही ते एकमेकांचे चांगले मित्र असून मुलांच्या संगोपनासाठी एकत्र वेळ घालवत असतात. आता तब्बल 12 वर्षांनंतर सुझानचा भाऊ आणि अभिनेता झायेद खान (Zayed Khan) याने त्यांच्या विभक्त होण्यामागील कारणावर खुलासा केला आहे.

नातं टिकवण्याचा प्रयत्न झाला, पण गोष्टी जुळल्या नाहीत :

एका मुलाखतीत बोलताना झायेद खान म्हणाला की, काही नाती जपण्यासाठी प्रयत्न केले तरी ती जुळून येत नाहीत. अशा परिस्थितीत जबरदस्तीने नातं टिकवण्याचा प्रयत्न केल्यास दोघांनाही अधिक त्रास होऊ शकतो.

त्याने सांगितले की, जर दोन व्यक्ती एकमेकांसाठी योग्य नसतील तर त्या नात्यात राहिल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे हृतिक आणि सुझान यांनी मुलांच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या आयुष्यासाठी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

Hrithik Roshan | घटस्फोटानंतरही मैत्री कायम :

झायेदने पुढे सांगितले की, त्यांच्या कुटुंबाने समाजाच्या दबावाखाली जगण्यापेक्षा समजूतदारपणे निर्णय घेणे पसंत केले. लोकांना हे कदाचित विचित्र वाटू शकते, पण आयुष्यात आनंद शोधणे आणि पुढे जाणे हे अधिक महत्त्वाचे असते.

सध्या हृतिक रोशन (Hrithik Roshan) अभिनेत्री सबा आझाद हिला डेट करत असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सुझान खान अभिनेता अर्सलनं गोनी याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

झायेदच्या मते, प्रेम हा खूप व्यापक शब्द आहे. जरी हृतिक आणि सुझान वेगळे झाले असले तरी त्यांच्या मनात आजही एकमेकांविषयी आदर आणि काळजी कायम आहे. त्यामुळे घटस्फोटानंतरही त्यांनी आपापल्या आयुष्यात पुढे जात पुन्हा प्रेम शोधलं आहे.

News Title: Why Did Hrithik Roshan and Sussanne Khan Divorce? Zayed Khan Reveals Reason After 12 Years

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now