नागरिकांनो सावधान! उद्या ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

On: August 3, 2026 8:05 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस अनेक भागांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. हवामान विभागाने विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. 4 ऑगस्ट रोजी काही भागांत जोरदार तर इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घाटमाथा आणि विदर्भावर पावसाची नजर :

सध्या मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा बिकानेर, दिल्ली (Delhi), लखनऊ (Lucknow), पाटणा (Patna) मार्गे मणिपूर (Manipur) पर्यंत विस्तारलेला असून तो समुद्रसपाटीपासून सुमारे 0.9 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावरही होत असून कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आजच्या अंदाजानुसार पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, ठाणे, रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), अकोला (Akola), अमरावती, वाशिम, वर्धा आणि नागपूर (Nagpur) जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात जळगाव (Jalgaon), छत्रपती संभाजीनगर, जालना (Jalna), हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded), परभणी (Parbhani), लातूर, बीड (Beed), धाराशिव, सोलापूर (Solapur), पुणे (Pune), सातारा (Satara) आणि सांगली येथे ऊन-सावल्यांसह हलक्या सरींची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert | उद्या आणि बुधवारीही कायम राहणार पावसाचा प्रभाव :

मंगळवार, 4 ऑगस्ट रोजी पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर (Kolhapur) घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील यवतमाळ (Yavatmal), वर्धा, नागपूर, भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) या सात जिल्ह्यांतही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

बुधवारीही विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

News Title: Maharashtra Rain Alert Tomorrow

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now