‘इतक्या’ लाख भारतीयांचा देशाला रामराम, धक्कादायक आकडेवारी समोर

On: January 25, 2025 4:30 PM
Indians Citizenship
---Advertisement---

Indians Citizenship l अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशात येणाऱ्या अवैध स्थलांतरितांवर (Illegal Immigrants) कारवाई केल्यानंतर सर्वाधिक फटका भारतीयांना बसला आहे. देश सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचे प्रमाण जगभरात भारतीयांचे सर्वाधिक आहे. अमेरिकेत सर्वाधिक चर्चेत असलेला H1-B व्हिसा (H1-B Visa) देखील सर्वाधिक भारतीयांना मिळतो. त्यामुळे ट्रम्प यांच्या बदलत्या प्रशासकीय धोरणांचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसणार आहे.

अमेरिकेसह कॅनडा (Canada) सारख्या देशांमध्येही भारतीय मोठ्या प्रमाणात स्थायिक होत आहेत. या देशांत गेलेले भारतीय त्यांचे भारतीय नागरिकत्व सोडून देत आहेत. 2023 मध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली होती. गेल्या काही वर्षांत भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ट्रम्प बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्याच्या तयारीत आहेत आणि इमिग्रेशन (Immigration) धोरण कठोर करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय आपला देश का सोडत आहेत आणि त्यात वाढ का होत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारतीय नागरिकत्व सोडण्यामागील कारणे :

भारतीय नागरिकत्व सोडण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने परदेशातील चांगला पगार आणि चांगले वातावरण, भारताच्या तुलनेत परदेशातील उच्च शिक्षणाचा दर्जा, देशातील वाढते गुन्हेगारीचे प्रमाण, धार्मिक तेढ, व्यवसायाच्या संधींचा अभाव यांचा समावेश होतो. याशिवाय, भारतातील एकल नागरिकत्वाची तरतूद आणि दुहेरी नागरिकत्व (Dual Citizenship) नसणे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.

Indians Citizenship l कोणत्या देशांना पसंती? :

भारतीय नागरिकत्व सोडून जाणारे लोक प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया (Australia), यूके (UK), जर्मनी (Germany), थायलंड (Thailand), सिंगापूर (Singapore), मलेशिया (Malaysia), पेरू (Peru), नायजेरिया (Nigeria), झांबिया (Zambia) या देशांमध्ये स्थायिक होत आहेत. काही भारतीय नागरिकत्व सोडून पाकिस्तान (Pakistan) आणि चीनमध्ये (China) सुद्धा स्थायिक होत असल्याचे दिसून आले आहे.

दरवर्षी दीड लाख भारतीयांकडून नागरिकत्वाचा त्याग :

दरवर्षी सुमारे दीड लाख भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहेत. भारतीय नागरिकत्व सोडून या लोकांनी 135 देशांचे नागरिकत्व घेतले आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया सारखे मोठे देश आणि थायलंड, मलेशिया, पेरू, नायजेरिया आणि झांबिया सारखे छोटे देश देखील समाविष्ट आहेत. यातील बहुतांश लोकांनी नोकरीच्या (Job) निमित्ताने भारतीय नागरिकत्व सोडल्याचे दिसून येते.

News Title : Why are Indians Renouncing Their Citizenship?

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now