उद्या राज्यात हवामान कसं राहणार? वाचा हवामान अंदाज

On: August 6, 2026 7:45 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्र राज्यात पुढील तीन दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, तर काही जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

7 ते 9 ऑगस्टदरम्यान पावसाचा जोर वाढणार :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 7 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोकण-गोवा (Konkan-Goa) पट्ट्यातही तुरळक भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाडा (Marathwada) विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

8 ऑगस्ट रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी हवामान बदलण्याची शक्यता असून, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. या दिवशी काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 9 ऑगस्टलाही याच भागांत हवामानाचा हा पॅटर्न कायम राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert | मुंबईसह राज्यभर सतर्कतेचा इशारा :

मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये आकाश बहुतांश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहू शकते. हवामानातील बदल लक्षात घेता किनारपट्टी आणि शहरी भागांमध्येही आवश्यक ती दक्षता घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

दरम्यान, राज्य आपत्कालीन कार्य केंद्र (State Emergency Operations Centre) मार्फत जानेवारी 2026 पासून आतापर्यंत नैसर्गिक आपत्ती आणि विविध दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर तब्बल 1698 अलर्ट जारी करण्यात आले आहेत. तसेच वीज पडणे, अतिवृष्टी आणि भूस्खलनासंदर्भात 285 स्वतंत्र इशारे देण्यात आले असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने (State Disaster Management Department) दिली आहे.

News Title: Maharashtra Rain Alert for Three Days

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now