Alcohol Survey l भारतात महिला आणि पुरुषांमध्ये मद्यसेवनाचे प्रमाण किती आहे? देशातील सर्वाधिक मद्यपान करणारे राज्य (State) कोणते? असे प्रश्न तुम्हाला पडत असतील, तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून (Survey) आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
सर्वेक्षणातील ठळक बाबी :
हा सर्वेक्षण अहवाल अतिशय मनोरंजक असून, सध्या त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या अहवालातून, देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मद्यसेवन केले जाते, तसेच पुरुष आणि महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण किती आहे, याबद्दल माहिती मिळते.
सर्वेक्षणानुसार, ईशान्येकडील राज्ये मद्यसेवनाच्या बाबतीत आघाडीवर आहेत. विशेषतः ईशान्य भागातील महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.
Alcohol Survey l महिलांमध्ये मद्यसेवन: आसाम प्रथम क्रमांकावर :
या सर्वेक्षणानुसार, आसाममध्ये (Assam) महिलांचे मद्यपानाचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. देशपातळीवर १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मद्यपान करणाऱ्या महिलांचे प्रमाण केवळ १.२ टक्के असताना, आसाममध्ये हे प्रमाण तब्बल १६.५ टक्के आहे. त्यामुळे आसाम या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. आसामनंतर मेघालय (Meghalaya) दुसऱ्या क्रमांकावर असून, तेथे ८.७ टक्के महिला मद्यपान करतात.
पुरुष मद्यसेवन: अरुणाचल प्रदेश आघाडीवर :
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सर्वेक्षणानुसार, महिलांच्या मद्यसेवनाच्या बाबतीत अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) तिसऱ्या क्रमांकावर (३.३ टक्के) आहे. सिक्कीम आणि छत्तीसगडमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ०.३ आणि ०.२ टक्के आहे. पुरुषांच्या मद्यपानाच्या बाबतीत, अरुणाचल प्रदेश देशात आघाडीवर आहे. तेथील १५ ते ४९ वयोगटातील ५९ टक्के पुरुष मद्यपान करतात.






