विदर्भासह, मराठवाड्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडांसह जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

On: April 26, 2025 8:13 PM
weather update 2
---Advertisement---

Weather Update | गेल्या चोवीस तासांपासून देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी वीजांचा कडकडाट आणि पावसाचा अनुभव आला आहे. महाराष्ट्रातही पहाटेच्या सुमारास अनेक जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली असून काही भागांना विजांचा आणि वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात उष्णतेची लाट –

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने (India Meteorological Department) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शुक्रवारी (२५ एप्रिल) ब्रह्मपुरीत (Brahmapuri) ४५.९ अंश सेल्सिअस इतके उच्च तापमान नोंदले गेले. उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आगामी काही दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये (Weather Update) तापमानात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

शनिवारी (२६ एप्रिल) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे.

हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

रविवारी (२७ एप्रिल) रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी (२८ एप्रिल) नांदेड, लातूर, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर या भागातही हवामान बिघडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीचा विचार करून योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

News Title – weather update Heavy Rain and Storm Warning

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now