Weather Update | सध्या उन्हाळा ऋतु सुरू आहे. अनेक ठिकाणी उष्णतेनं नको नको करून ठेवलं. उष्णतेनं अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. राज्याचा विचार केल्यास काही जिल्ह्यांमध्ये 40 हून अधिक तापमान आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ येथे 45 अंशाहून अधिक तापमान आहे. तर राज्याबाहेर विचार केल्यास राजस्थानमध्ये फुलेदी शहरात तब्बल 50 अंश सेल्सिअस तापमान आहे. गेल्या आठवड्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाली. (Weather Update)
जोधपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 50°C गेला आहे. या महिन्यात तापमानाचा उच्चांक गाठला आहे. याआधी 19 मे 2016 मध्ये 51 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेले होते. राजस्थान येथील जोधपूर 46.9 डिग्री सेल्सियस तापमान आहे. तर जैसलमेर येथे 48 डिग्री सेल्सियस तापमान होते. कोटा 46.3 डिग्री सेल्सियस तापमान आहे. तर जयपूर येथे 43.8 तापमान आहे. (Weather Update)
तापमान वाढण्याचं नेमकं कारण काय?
तापमान वाढण्याचं नेमक कारण आता समोर आलं आहे. आयएमडीचे महानिदेशक एम. महापात्र यांनी म्हटले की, हवेची यंदा दिशा अधिक बदलल्याने तापमानात बदल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जमीनीवरून वाहणारे अत्यंत कोरडे वारे, उष्ण वारे हे ईशान्य भारतावर परिणाम करताना दिसत आहे. वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल हा प्रामुख्याने आखाती भागात चक्रिवादळ निर्माण झाल्यामुळे आहे. (Weather Update)
महाराष्ट्राची परिस्थिती
राज्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमानात (Weather Update) प्रचंड वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये राज्यात तापमानाचा चटका 45 अंशाहून अधिक आहे. याच परिणाम हा जनजीवनार झाला आहे. उन्हाचा तडाखा हा वीजकंपन्यांना बसला आहे. जिल्ह्यात तापमान अधिक वाढले असून त्याचा फटका आता वीज वितरण कंपनीला देखील बसला आहे.
27 ते 29 मे मध्ये हलका पाऊस होणार असल्याचं हवामान अंदाजाने माहिती दिली आहे. याचदिवशी मेघगर्जनेसह पाऊस पडल्याचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्याआधी मान्सून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
News Title – Weather Update About Temperature Reach At 50 Degrees Marathi News Update
महत्त्वाच्या बातम्या
“कुणीतरी लवकरच रस्त्यावर..”; घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच हार्दिकच्या बायकोची खळबळजनक पोस्ट
घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच नताशाच्या डेटिंगच्या चर्चा; हार्दिक पांड्यापूर्वी कुणाच्या प्रेमात होती?
48 तासांत ‘रेमल’ चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
“कायदा आणि नियम फक्त सामान्य माणसांना छळण्यासाठी आहेत काय?”
शिखर धवन ‘या’ महिला क्रिकेटरशी करणार दुसऱ्यांदा लग्न?; स्वतःच केला मोठा खुलासा






