Weather Update | राज्यात मान्सूनने जोरदार बॅटिंग केली आहे. राज्यातील विविध भागात हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. मुंबई, रायगड, पालघरमध्ये पावसाने कहर केला आहे. पालघरमधील देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पालघर येथील पूल पाण्याखाली गेल्याने पालघर आणि मनोर वाडा यांच्यामधील संपर्क तुटला आहे. (Weather Update)
राज्यातील ‘या’ परिसरात पावसाची बॅटिंग
मुंबई, ठाणे आणि भिवंडी परिसरात पावसाने धिंगाणा घातला आहे. रात्री झालेल्या पावसाने भिंवडी शहरात पाणी साचलं आहे. यामुळे मुंबई शहरातील वातावरण थंड झालं आहे. जुहू बीचवर मुंबईकरांना आणि पर्यटकांनी एकच गर्दी केली आहे. या ठिकाणी लोकांची वर्दळ वाढली आहे. हवामान विभागाने खात्याने मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. (Weather Update)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार (Weather Update) मुंबई 6 दिवसांपर्यंत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज आणि उद्या म्हणजे 20 आणि 21 जून रोजी पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर 22 ते 25 जूनपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे.
पुणे शहरात देखील पावसाने थैमान घातलं आहे. राज्यभरात पाऊस पोहोचू लागला आहे. कमाल तापमान हे 31-32 आहे. तर किमान तापमान 26-23 सेल्सिअस तापमान आहे. अशातच आता मुंबई, रायगड, ठाणे, भिवंडीप्रमाणे कल्याण आणि डोंबिवलीत सकाळपासून मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. (Weather Update)
कल्याण डोंबिवलीत पावसाचा धिंगाणा
कल्याण डोंबिवलीत पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून महानगरपालिकेची पोलखोल दिसून आली आहे. याचं खरं कारण म्हणजे शहरातील अनियमित नालेसफाई. कल्याणच्या पूर्वेकडील पीसवली भागात पावसामुळे जलमय परिसर झाल्याचं दिसून आला.
News Title – Weather Update About Monsoon In Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
“40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचं कमोड..”; आलिशान पॅलेसमुळे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अडचणीत
सुजय विखेंना पराभव पचेना; घेतला मोठा निर्णय, निलेश लंकेंविरोधात…
‘आम्हाला भिडवत ठेवलं तर… ‘; मनोज जरांगेंचा थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा
बहुचर्चित ‘मुंज्या’चा थरार आता ओटीटीवर दिसणार; कधी आणि कुठे पाहणार?






