बापानंतर आता लेकाच्या अडचणीही वाढल्या; वाल्मिक कराडच्या मुलावर गंभीर आरोप

On: January 25, 2025 4:01 PM
Walmik Karad Son Under Scrutiny in Mahadev Munde Murder Case
---Advertisement---

Walmik Karad | मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणात सतत चर्चेत असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad)  अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आता त्याचा मुलगाही कायदेशीर पेचात सापडला आहे.

परळीतील (Parli) पिग्मी एजंट महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचे नाव समोर आले आहे. या प्रकरणाला आज दीड वर्ष पूर्ण झाले असून महादेव यांचा खून कोणी आणि कशासाठी केला, या प्रश्नाचे उत्तर अद्यापही अनुत्तरीत आहे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास संशयाच्या फेऱ्यात

या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासूनच संशयाच्या फेऱ्यात सापडला आहे. भाजप आमदार (BJP MLA) सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची मुले सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल १५० कॉल (Call) केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे.

तसेच, त्यांनी या दोघांच्या फोन कॉलची पडताळणी करण्याची मागणी देखील केली आहे. तपास करणारे पोलीस कर्मचारी हे वादग्रस्त असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Walmik Karad)

मुंडे कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा

महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची मुले जेरबंद होतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक नवनीत कावत (Navneet Kavat) हे महादेव मुंडे यांना न्याय देतात का, याकडे मुंडे कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणाचा निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने तपास करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा मुंडे कुटुंबीय आणि परळीतील नागरिक व्यक्त करत आहेत. (Walmik Karad)

Title : Walmik Karad Son Under Scrutiny in Mahadev Munde Murder Case

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now