वाल्मिक कराडच्या आईची तब्येत खालावली; अन्न-पाणीही सोडलं!

On: January 14, 2025 4:59 PM
Walmik Karad Mother
---Advertisement---

Walmik Karad Mother l मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. मात्र त्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. अशातच आज अनेक ठिकाणी रस्त्यावर टायर जाळत आंदोलन केलं आहे.

कराडच्या आईची तब्येत खालावली :

वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलनामध्ये कराडची पत्नी, सून आणि आई सहभागी झाले आहेत. आज परळी पोलीस स्टेशनबाहेर वाल्मिक कराडच्या कुटुंबाने हे ठिय्या आंदोलन केलं आहे, तसेच धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडची आई काल रात्रीपासून पाणी देखील प्यायली नाही. कारण सकाळी आठ वाजल्यापासून वाल्मिक कराडचं कुटुंब आंदोलनाला बसलं आहे.

अशातच आता वाल्मिक कराडच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे पोलीस त्यांना दवाखान्यात घेऊन जा असं वारंवार कराडच्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत, पण वाल्मिक कराडच्या आईने दवाखान्यात जायला नकार दिला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या आईला दम्याचा, गुडघ्याचा आणि रक्तदाबाचा त्रास असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

Walmik Karad Mother l कराडवर मोक्का लागल्यामुळे नेमकं काय होणार? :

वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यामुळे पोलिसांना तपासासाठी तब्बल 180 दिवस मिळणार आहेत. तसेच याप्रकरणी पोलीस 180 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करू शकतात, तसेच मोक्का लावल्यामुळे आरोपीला लवकर जामीन देखील मिळत नाही, याशिवाय आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येत असतो.

दरम्यान, वाल्मिक कराडची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराडला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.

News Title : Walmik Karad mother health deteriorated

महत्वाच्या बातम्या-

“निव्वळ जातीयवाद”, मोक्का लागताच कराडच्या बायकोने केले मोठे आरोप

वाल्मिक कराडवर मोक्का अन् 10 मिनिटांत परळी बंद!

वाल्मिक कराडसाठी महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न!

अखेर वाल्मिक कराडवर मोक्का लावला; खूनाचा गुन्हा दाखल होणार?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नव्या SIT पथकात ‘या’ 9 अधिकाऱ्यांचा समावेश!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now