“निव्वळ जातीयवाद”, मोक्का लागताच कराडच्या बायकोने केले मोठे आरोप

On: January 14, 2025 4:29 PM
Walmik Karad Wife
---Advertisement---

Walmik Karad Wife l आज वाल्मिक कराडवर मोक्का लावून 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे त्याचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले आहेत. अशातच सकाळपासून वाल्मिक कराडची आई आणि पत्नी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मात्र यावेळी या संपूर्ण प्रकरणावर वाल्मिक कराडची बायको प्रचंड संतापली आहे.

वाल्मिक कराडची बायको काय म्हणाली? :

वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर त्याच्या बायकोने प्रचंड आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणात निव्वळ जातीयवाद होत असल्याचं तीन म्हंटल आहे. तसेच कोणतेही पुरावे नसताना त्यांच्यावर म्हणजेच वाल्मिक कराडवर केवळ दबावातून कारवाई केली जात आहे. मात्र हे सर्व प्रकरण अतिशय अयोग्य असल्याचं वाल्मिक कराडच्या पत्नीने म्हटलं आहे”.

याशिवाय “त्यांचा म्हणजेच वाल्मिक कराडचा खंडणी आणि खून प्रकरणात कुठलाही सहभाग नाही. परंतु, हे आंदोलन आणि वेठीस धरून वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल होणार असाल तर हा प्रकार अजिबात चांगला नाही. कारण आता त्यांच्यावर जाणून बुजून कारवाई करायला लावणार असतील तरे हे लवकरात लवकर थांबल पाहिजे”, असं वाल्मिक कराडची पत्नी म्हणाली आहे.

Walmik Karad Wife l “या प्रकरणात जातीयवाद केला जातोय” :

याप्रकरणी कराडच्या बायकोला पोलीस आणि सरकार अशी कारवाई कशामुळे करतंय? असा प्रश्न विचारताच त्यांनी उत्तर दिल आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, “या प्रकरणात जातीयवाद केला जात आहे. कारण जातीवादाशिवाय दुसरा काहीही विषय यामध्ये येत नाही. तसेच गुन्हेगाराला जात नसते. त्यामुळे पोलिसांना तपास करायचा असल्यास करावा, मात्र जात मध्ये आणून तुम्ही नेमकं काय साध्य करताय? तसेच ते दोषी नाहीयेत”, अशी बाजू वाल्मिक कराडच्या पत्नीने मांडली आहे.

दरम्यान, वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्याची बातमी कळताच परळीत कराड समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. यामध्ये वाल्मिक कराडची पत्नी, आई आणि नातेवाईकांनी देखील आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

News Title : Walmik Karad Wife First Reaction on karad macoca

महत्वाच्या बातम्या-

वाल्मिक कराडवर मोक्का अन् 10 मिनिटांत परळी बंद!

वाल्मिक कराडसाठी महिलांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा केला प्रयत्न!

अखेर वाल्मिक कराडवर मोक्का लावला; खूनाचा गुन्हा दाखल होणार?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नव्या SIT पथकात ‘या’ 9 अधिकाऱ्यांचा समावेश!

पुणेकरांना महिंद्रांकडून नववर्षात सर्वात मोठं गिफ्ट, तब्बल 4500 कोटी…

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now