संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नव्या SIT पथकात ‘या’ 9 अधिकाऱ्यांचा समावेश!

On: January 14, 2025 1:34 PM
Santosh Deshmukh Murder
---Advertisement---

Santosh Deshmukh New SIT l सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या करण्यात आली. मात्र आता या हत्या प्रकरणात आधीचे SIT पथक बरखास्त करून पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या अध्यक्षतेखाली तब्ब्ल 9 अधिकाऱ्यांचे विशेष पथक देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर स्थापन करण्यात आले. त्यामुळे आता या प्रकरणाचा खुलासा वेगाने होण्याची शक्यता आहे.

देशमुख कुटुंबियांनी तपास पथकातील अधिकाऱ्यांवर घेतला आक्षेप :

राज्य सरकारने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींची चौकशी करण्यासाठी डॉ.बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली SIT पथक स्थापन केले होते. परंतु त्यातील काही अधिकाऱ्यांचे मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबरोबर संबंध असल्याचा आरोप झाल्यानंतर संतोष देशमुख कुटुंबियांनी तपास पथकातील अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला आहे.

मात्र जर मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय पोलीस तपास करणार असतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार असा सवाल देशमुख कुटुंबियांनी उपस्थित केला आहे. मात्र त्यावर आता राज्य शासनाने अंतिमत: विचार करून जुने विशेष तपास पथक बरखास्त केले आहे आणि आता नव्या पथकाची घोषणा केली आहे.

Santosh Deshmukh New SIT l SIT पथकात कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश :

डॉ.बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली SIT पथक नेमलं होत त्या पथकाला अधिकारी वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र त्यानंतरराज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. मात्र नवीन SIT पथकात कोणकोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे ते पाहुयात…

अनिल गुजर – पोलीस उपअधीक्षक
महेश विघ्ने – पोलीस उपनिरीक्षक
विजयसिंह जोनवाल – सहाय्यक पोलीस निरीक्षक
आनंद शिंदे – पोलीस उपनिरीक्षक
तुळशीराम जगताप – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
मनोज वाघ – पोलीस हवालदार
चंद्रकांत काळकुटे – पोलीस नाईक
बाळासाहेब अहंकारे – पोलीस नाईक

News Title : Santosh Deshmukh New SIT

महत्वाच्या बातम्या –

 महापालिका निवडणुकीचा मुहुर्त ठरला! CM फडणवीसांनी दिले संकेत

बीडमध्ये हालचालींना वेग, नवीन SIT स्थापन होताच महत्त्वाचा निर्णय

‘माझ्या लेकानं काही केलं नाही, तो निर्दोष…’; वाल्मिक कराडच्या आईचं परळीत आंदोलन

वाल्मिक कराडविरोधात सीआयडीचं सर्वात मोठं पाऊल!

मकर संक्रांतीला काळ्या तिळाचे लाडू का खातात?, काय आहे त्यामागील कारण?

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now