Walmik Karad | संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) संपत्तीचे नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता तर कराड लातूरमध्ये (Latur) आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावे एक आलिशान बंगला बांधत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. सुरेश धस (Suresh Dhas) यांनी याबद्दल गौप्यस्फोट केल्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील उच्चभ्रू वस्तीत हा बंगला बांधण्यात येत होता. परंतु, संतोष देशमुख प्रकरण समोर आल्यानंतर बंगल्याचे बांधकाम थांबवण्यात आले आहे. हा बंगला ज्योती मंगल जाधव यांच्या नावे असून, बोरगाव काळे येथील जमीनही त्यांच्याच नावावर आहे. ज्योती मंगल जाधव या वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
बंगल्याचे बांधकाम अचानक का थांबले?
संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्या अनेक बेनामी मालमत्ता उघडकीस येण्यास सुरुवात झाली. लातूरमधील या बंगल्याचे बांधकाम सुरू असतानाच हे प्रकरण समोर आले आणि त्यानंतर लगेचच बांधकाम थांबवण्यात आले. या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे बोलले जात आहे.
सुरेश धस यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) लातूरमधील अनेक मालमत्तांचा उल्लेख केला होता. त्यानंतर या बंगल्याची माहिती समोर आली. ज्योती मंगल जाधव यांच्या नावावरील जागेची कागदपत्रे तपासल्यानंतर हा बंगला त्यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, अद्याप या जागेबाबत कोणीही अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.
लातुरात कराडची आणखी किती मालमत्ता?
वाल्मिक कराडच्या लातूर जिल्ह्यात अनेक मालमत्ता असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली होती. हा बंगला समोर आल्यानंतर कराडच्या आणखी किती मालमत्ता आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बंगल्याचे बांधकाम थांबल्यानंतर या जागेबाबत कोणीही बोलायला तयार नाही.
या सगळ्या प्रकारामुळे वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. लातूरमधील या बंगल्याचे प्रकरण आता काय वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Title : Walmik Karad Latur Bungalow Second Wife Jyoti Mangal Jadhav






