वाकड पोलीस ॲक्शन मोडमध्ये! अवघ्या २४ तासांत घरफोडी अन् वाहनचोरीचा छडा; गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

On: March 26, 2026 6:25 PM
Pimpri Chinchwad Crime
---Advertisement---

Pimpri Chinchwad Crime | पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असताना वाकड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सराईत गुन्हेगाराला अटक करत पोलिसांनी मोठा मुद्देमालही जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Burglary Case Pune)

या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून सुमारे २ लाख ६७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा माग काढला आणि त्याला ताब्यात घेत मोठा गुन्हा उघडकीस आणला.

सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोच :

वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४६/२०२६ अंतर्गत घरफोडी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये ताथवडे परिसरातील डेअरी फार्मजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. (Pimpri Chinchwad Crime News)

यानंतर पोलिसांनी आदिल नुमान खान (वय २७, रा. नायगाव, मुंबई) याला ताब्यात घेत सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच वाकडसह शिरवळ (सातारा) आणि मुंबईतील विविध भागात अशा प्रकारचे गुन्हे केल्याची माहितीही समोर आली आहे.

Wakad Police News | २.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त :

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून मोठा ऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये दोन मोपेड दुचाकी, तीन मोबाईल फोन, मॅकबुक, एअरपोड्स, चार्जर, डिजिटल गेमिंग प्लेस्टेशन, कंट्रोलर आणि अॅडॉप्टर यांचा समावेश आहे. या सर्व वस्तूंची एकूण किंमत सुमारे २ लाख ६७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Wakad Police News)

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त बसवराज तेली आणि सारंग आव्हाड तसेच उपायुक्त विशाल गायकवाड व सहायक आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग आणि त्यांच्या तपास पथकाने ही कामगिरी बजावली. दरम्यान, आरोपीने पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि इतर भागात आणखी गुन्हे केल्याची शक्यता असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे करत आहेत.

News Title: Wakad Police Solve Burglary and Vehicle Theft Case Within 24 Hours, Accused Arrested

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now