जागतिक बाजारात मोठा भूकंप! ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे शेअर मार्केट क्रॅश

On: July 8, 2026 4:37 PM
Donald Trump
---Advertisement---

Donald Trump | आजचा दिवस शेअर बाजारातील (Stock Market) गुंतवणूकदारांसाठी मोठा धक्कादायक ठरला. दिवसाची सुरुवातच घसरणीने झाल्यानंतर व्यवहाराच्या अखेरच्या टप्प्यात विक्रीचा जोर वाढला आणि सेन्सेक्स तसेच निफ्टीमध्ये मोठी पडझड झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराण (Iran) संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर भारतासह जागतिक बाजारांमध्ये अस्थिरता वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शेवटच्या तासात बाजारात मोठी पडझड :

बुधवारी सकाळपासूनच बाजारात नकारात्मक वातावरण होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange) वरील 30 प्रमुख कंपन्यांचा सेन्सेक्स (Sensex) मागील 78,180 च्या बंद पातळीच्या तुलनेत घसरणीसह सुरू झाला. व्यवहार सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत निर्देशांक 550 हून अधिक अंकांनी खाली आला. त्यानंतर काही काळ किरकोळ चढ-उतार सुरू असले तरी दुपारनंतर विक्रीचा दबाव झपाट्याने वाढला. दुपारी सुमारे 2.37 वाजेपर्यंत सेन्सेक्स तब्बल 1,900 अंकांनी घसरून 76,277 च्या आसपास पोहोचला.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (National Stock Exchange) वरील निफ्टी (Nifty) निर्देशांकाचीही अशीच अवस्था झाली. 24,398 च्या मागील बंद पातळीच्या तुलनेत व्यवहार सुरू झाल्यानंतर तो सुरुवातीला 24,259 पर्यंत घसरला. त्यानंतर घसरण अधिक तीव्र होत गेली आणि अखेरीस सुमारे 550 अंकांच्या घसरणीसह निफ्टी 23,845 च्या पातळीवर पोहोचला. लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप अशा सर्वच विभागांमध्ये विक्रीचा मोठा दबाव दिसून आला.

Donald Trump | ट्रम्पच्या वक्तव्याचा जागतिक परिणाम :

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत कोणताही नवीन करार करण्यास आपण तयार नसल्याचे स्पष्ट केले. इराणसोबत झालेल्या कराराचा काळ संपल्याचे सांगत त्यांनी अशा चर्चांमध्ये वेळ घालवण्याची आवश्यकता नसल्याचे मत व्यक्त केले. तसेच इराणशी कोणत्याही नव्या कराराची इच्छा नसल्याचे आणि हा विषय आता संपल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले. या विधानानंतर जागतिक आर्थिक बाजारांमध्ये अस्वस्थता वाढली.

या घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलाच्या बाजारावरही झाला. ब्रेंट क्रूड (Brent Crude) सुमारे 6.50 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 79 डॉलरच्या जवळ पोहोचले, तर डब्ल्यूटीआय क्रूड (WTI Crude) 75 डॉलरच्या पातळीवर गेले. दरम्यान, बीएसई लार्जकॅपमधील सर्व 30 समभाग घसरणीसह व्यवहार करत होते. IndiGo, Maruti, HUL, Bajaj Finance, M&M, Asian Paints आणि BEL यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. याशिवाय HDFC Bank, Axis Bank, ICICI Bank, SBI, Reliance, Adani Ports, HCL आणि TCS या प्रमुख कंपन्यांचे समभागही 2 टक्क्यांहून अधिक घसरले.

News Title: Donald Trump Remark Shakes Global Markets

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now