फडणवीस-सामंत यांच्या भेटीनंतरही विनोद पाटील ठाम, मुख्यमंत्री उचलणार मोठं पाऊल!

On: April 23, 2024 12:37 PM
Vinod Patil determined to contest Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha elections
---Advertisement---

Vinod Patil | छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आला आहे. संभाजी नगर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे नेते तथा मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र शिवसेनेच्या या जागेवर मराठा आंदोलनाचे नेते विनोद पाटील यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. यासाठी त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय.

कालच 22 एप्रिलरोजी विनोद पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते. या भेटीनंतर त्यांनी निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं जाहीर केलं होतं. महायुतीकडून उमेदवारी मिळाली तर मी ही जागा लढणार आणि नाही मिळाली तरीही मी ताकतीने ही निवडणूक लढवणार. आता महायुतीने काय ते ठरवायचं आहे, असं विनोद पाटील म्हणाले होते.

विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम

त्यातच सोमवारी रात्री उशीरा शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी विनोद पाटील यांची भेट घेतली. या भेटीत उदय सामंत यांनी विनोद पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची विनंती केली. मात्र पाटील यांनी आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं जाहीर केलं. यामुळे भूमरे यांची चिंता वाढली आहे. त्यांनी कालच घाईघाईत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

विनोद पाटील यांची समजून काढण्यात सामंत यांनाही अपयश आलं आहे. आता ही बाब सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली आहे. त्यामुळे शिंदे काय भूमिका घेणार, त्याकडे सर्वांचं लक्ष राहील. मुख्यमंत्री शिंदे आज (23 एप्रिल) बुलढाण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते विनोद पाटील (Vinod Patil) यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

फडणविसांच्या भेटीनंतर विनोद पाटील आक्रमक

उदय सामंत यांच्या भेटीत विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वेक्षण करण्याची मागणी केली. सर्वेक्षणात माझ्या बाजूने निकाल नसेल तर मला तिकीट देऊ नका. अजूनही वेळ गेलेली नाही, छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवार बदला, असं आवाहनच पाटील यांनी केलं आहे. फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विनोद पाटील अधिकच आक्रमक दिसून येत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे संभाजीनगर मतदारसंघात अजूनच ट्विस्ट आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विनोद पाटील (Vinod Patil) यांनी एक दावाही केला होता. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही इच्छा होती की मी इथून निवडणूक लढवावी. मात्र महायुतीमधील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांचा माझ्या उमेदवारीला विरोध होता. या निर्णयावर अजूनही पुनर्विचार होईल’, असं विनोद पाटील म्हणाले होते. आता छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार बदलला जाणार काय, हे पाहावं लागेल.

News Title : Vinod Patil determined to contest Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha elections

महत्त्वाच्या बातम्या –

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

थंड घ्या… चिन्मय मांडलेकर ट्रेलिंग प्रकरणावर किरण मानेंचं बेधडक भाष्य

Join WhatsApp Group

Join Now