IPL 2025 l सध्या भारतीय (Indian) देशांतर्गत क्रिकेटमध्ये (Domestic Cricket) रणजी ट्रॉफी 2025 (Ranji Trophy 2025) सामन्यांना सुरुवात झाली आहे. बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियातील (Team India) खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची सक्ती केल्याने अनेक स्टार खेळाडू (Star Players) बऱ्याच वर्षांनी रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना दिसत आहेत. मात्र अशातच सुरु असलेल्या रणजी सामन्यांमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. आयपीएल 2025 (IPL 2025) सुरू होण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders – KKR) स्टार खेळाडूला रणजी सामन्यादरम्यान दुखापत झाली, त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट (Retired Hurt) होऊन मैदानाबाहेर (Out of the Ground) जावे लागले.
या बातमीच्या माध्यमातून आपण व्यंकटेश अय्यरच्या दुखापतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. ही दुखापत केकेआरसाठी (KKR) किती चिंताजनक आहे आणि त्याचा आयपीएल 2025 वर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.
व्यंकटेश अय्यरला दुखापत :
गुरुवारी 23 फेब्रुवारीपासून मध्य प्रदेश (Madhya Pradesh) विरुद्ध केरळ (Kerala) यांच्यात सामन्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मध्य प्रदेशकडून फलंदाजी (Batting) करणाऱ्या व्यंकटेश अय्यरला दुखापत झाली. व्यंकटेश अय्यर फलंदाजी करताना त्याच्या उजव्या पायाचा घोटा (Right Ankle) दुखावला, त्यामुळे वेदनेने (Pain) कळवळत व्यंकटेश मैदानावर बसला. दरम्यान फिजिओ (Physio) त्याच्याजवळ आले, त्यांनी अय्यरला तपासले परंतु वेदना कमी होत नसल्याने अय्यरला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर पडावे लागले. दुखापत झालेल्या व्यंकटेश अय्यरला नीट चालता सुद्धा येत नव्हते, फिजिओ आणि राखीव खेळाडूंच्या (Reserve Players) आधाराने तो मैदानाबाहेर आला. व्यंकटेश अय्यरने 80 बॉलमध्ये (Balls) 42 धावा (Runs) केल्या होत्या. मध्य प्रदेशच्या संघाने पहिल्या डावात (First Innings) 10 गडी गमावून (Wickets) 160 धावा केल्या.
IPL 2025 l केकेआरसाठी चिंतेची बाब :
व्यंकटेश अय्यरला झालेली दुखापत फार गंभीर नसावी अशी प्रार्थना कोलकाता नाईट रायडर्स करत असेल. केकेआरने आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये (Mega Auction) व्यंकटेश अय्यरला तब्बल 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार (Media Reports) आयपीएल 2025 साठी गतविजेत्या (Defending Champions) केकेआरचे कर्णधारपद (Captaincy) व्यंकटेश अय्यरकडे सोपवले जाऊ शकते. परंतु आयपीएलचा नवा हंगाम (Season) सुरु होण्यासाठी काहीच महिने शिल्लक असताना व्यंकटेश अय्यरला झालेली ही दुखापत केकेआरचे टेंशन (Tension) वाढवणारी आहे.
व्यंकटेश अय्यरची दुखापत केकेआरसाठी एक मोठा धक्का ठरू शकते. तो संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्या दुखापतीमुळे संघाच्या आयपीएल 2025 च्या मोहिमेवर परिणाम होऊ शकतो.






