वसंत मोरे यांचं ठाकरे गटात मोठं प्रमोशन, मनसेला दिला थेट इशारा, म्हणाले…

On: February 10, 2025 3:27 PM
Vasant More
---Advertisement---

Vasant More l पुण्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती दिसत आहे. शिंदे गटाचा दबदबा वाढत असताना ठाकरे गटाची पडझड चिंतेचा विषय बनलेली आहे. यामध्ये पुण्यातील फायरब्रँड नेता वसंत मोरे (Vasant More) यांना ठाकरे गटाने महापालिका निवडणुकीसाठी समन्वयक प्रमुखपदी निवड दिली आहे. प्रमोशन मिळाल्यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला डिवचण्याची संधी सोडली नाही.

वसंत मोरे आणि मनसेचा सामना :

वसंत मोरे यांच्या महापालिका समन्वयक प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर, त्यांनी मनसेला डिवचण्यासाठी एक बॅनरबाजी सुरू केली. मनसेच्या स्थानिक कार्यालयाबाहेर बॅनर लावून वसंत मोरे यांनी ‘आता भगवा फडकवणारच’ असा इशारा दिला.

‘मिशन महापालिका’ असा घोष करणाऱ्या वसंत मोरे यांनी आपले सगळे सूत्र हातात घेतल्याचे स्पष्ट केले. या कृत्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Vasant More l मनसेला रामराम आणि ठाकरे गटाची साथ :

वसंत मोरे आणि मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये बिनसल्यावर मोरे यांनी मनसेला रामराम ठोकला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा दिला आणि वंचित बहुजन आघाडीला साथ दिली.

लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीच्या आधी वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश झाले होते. त्यांनी हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढवली, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत.

पुणे महापालिकेसाठी वसंत मोरेचा पुढाकार :

पुण्यात ठाकरे गटाची गळती रोखण्यासाठी वसंत मोरे यांनी पुढाकार घेतले आहे. काही दिवसांपूर्वी, पुण्याचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत पुण्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितला होता. यापूर्वी, 5 माजी नगरसेवक आणि माजी आमदार महादेव बाबर यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्यामुळे ठाकरे गटाला काही समस्या भेडसावत होत्या. वसंत मोरे यांनी त्याला तोंड देण्यासाठी चांगला प्रयत्न सुरू केला आहे.

News Title: Vasant More Gets Promoted in Shiv Sena, Takes On MNS

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now