15 दिवस घर बंद, डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडताच घरमालक हादरला, वसईतील घटनेने खळबळ

On: February 11, 2025 5:04 PM
Kolhapur Crime
---Advertisement---

Vasai Suicide l वसई (Vasai) येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एव्हरशाईन सिटीमधील (Evershine City) मंगल वंदन सोसायटीत राहणाऱ्या बहीण-भावाने 25 लाखांच्या कर्जामुळे आत्महत्या (Suicide) केली. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक अडचणीत होते. त्यांच्या घराचा दरवाजा 15 दिवसांपासून बंद असल्याने घरमालकाने पोलिसांना बोलावून, डुप्लिकेट चावीने (Duplicate Key) दरवाजा उघडला असता, दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हनुमंता श्रीधर प्रसाद (Hanumanta Shridhar Prasad) (40) आणि यमुना श्रीधर प्रसाद (Yamuna Shridhar Prasad) (45) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे वसईच्या एव्हरशाईन सिटीमधील मंगल वंदन सोसायटीत राहत होते. ते दोघेही कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर 25 लाखांचे कर्ज होते. तसेच, ते कार्यालयातील काही लोक आणि मोठ्या भावाकडून उसने पैसे मागत होते.

विष प्राशन करून आत्महत्या :

या आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न सापडल्याने दोघा बहीण-भावाने राहत्या घरातील बेडरूममध्ये (Bedroom) विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. गेल्या पंधरा दिवसांपासून घराचा दरवाजा न उघडल्याने आणि घरातून दुर्गंधी येत असल्याने, घरमालकाने सोमवारी दुपारी 112 नंबरवर कॉल करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने घरात प्रवेश केला, तेव्हा दोघा बहीण-भावाचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आचोळे पोलिसांनी (Achole Police) या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

वांद्र्यात वृद्ध महिलेची हत्या :

दरम्यान, वांद्रा (Bandra) येथे एका वृद्ध महिलेला बांधून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेखा खोंडे (Rekha Khonde) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी (दि. 11) ही घटना उघडकीस आली. मारेकऱ्यांनी रेखा खोंडे यांचे हात बांधून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

रेखा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भाभा रुग्णालयात (Bhabha Hospital) पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या हत्येमागील कारण शोधत आहेत.

News title : Vasai Suicide: Siblings End Lives Over Rs 25 Lakh Debt

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now