वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

On: March 13, 2025 1:41 PM
Pune News
---Advertisement---

Vande Bharat Express l वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railways) या गाडीतील सामानाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. महाराष्ट्रात सध्या 11 वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.

सीएसएमटी (CSMT) ते जालना
सीएसएमटी ते मडगाव
सीएसएमटी ते सोलापूर
सीएसएमटी ते शिर्डी
मुंबई सेंट्रल (Mumbai Central) ते गांधीनगर
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद
नागपूर (Nagpur) ते बिलासपूर
नागपूर ते इंदूर
नागपूर ते सिकंदराबाद
पुणे (Pune) ते कोल्हापूर
पुणे ते हुबळी

वंदे भारत एक्स्प्रेसमधील सामानाचे नियम

वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आरामदायी खुर्च्या (Sitting Chairs) आहेत. सीटखाली सामान ठेवण्यासाठी जागा नाही. प्रत्येक प्रवाशाला दोनपेक्षा जास्त ट्रॉली बॅग (Trolley Bags) घेऊन जाण्याची परवानगी नाही.

सामान ठेवण्यासाठी सीटच्या वर रॅक (Rack) आहेत. मोठे बॉक्स (Boxes) घेऊन जाण्यास परवानगी नाही. प्रवाशांनी आपले सामान सीटच्या बाजूला ठेवू नये, कारण त्यामुळे इतर प्रवाशांना ये-जा करण्यास अडचण होईल.

Vande Bharat Express l सामान चोरी झाल्यास काय करावे? :

वंदे भारत ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) आहेत. मात्र, सामान चोरीला गेल्यास, प्रवाशांनी तत्काळ अटेंडंट (Attendant), गार्ड (Guard) किंवा जीआरपी एस्कॉर्टकडे (GRP Escort) तक्रार करावी.

News title : Important News for Vande Bharat Express Passengers: Changes in Luggage Rules

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now